आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Election 2022 | Marathi News | Arvind Kejriwal Attacks BJP Congress; Khalistani Responds To Criticism By Saying, "I Am The Sweetest Terrorist In The World."

प्रचाराचा आज शेवटचा दिवस:अरविंद केजरीवालांचा भाजप-काँग्रेसवर हल्लाबोल; खालीस्तानी टिकेला प्रत्युत्तर देत म्हणाले, "मी जगातील सर्वांत स्वीट दहशतवादी"

चंदीगढ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जनेतला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील पंजाब दौऱ्यावर असून, त्यांनी आज भाजपसह काँग्रेसवर टीकास्त्र केले. मी जगातील सर्वात मोठा दहशतवादी आहे असे काँग्रेस आणि भाजपला वाटते, मात्र त्यांनीच गेल्या 70 वर्षांत पंजाबला लुटले आहे. असा घणाघात केजरीवाल यांनी केला आहे.

10 वर्षे त्यांची सुरक्षा काय करत होती: केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 'मोदीजी, प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सगळेच म्हणत आहेत की, गेल्या 10 वर्षांपासून केजरीवाल देशाचे दोन तुकडे करण्याचा विचार करत आहे, आणि त्यांना एका तुकड्याचे पंतप्रधान व्हायचे आहे. हे असे होऊ शकते का? हा विनोद आहे, याचा अर्थ मी मोठा दहशतवादी झालो आहे. 10 वर्षात 3 वर्षे काँग्रेसचे सरकार होते, 7 वर्षे भाजपचे सरकार होते. इतक्या वर्षांत त्यांनी मला अटक का केली नाही? त्यांची सुरक्षा एजन्सी काय करत होती आणि हे लोक झोपले होते का?' असे म्हणत केजरीवाल यांनी मोदी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला.

कदाचित मी जगातील सर्वात गोड दहशतवादी आहे: केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'कदाचित मी जगातील सर्वात गोड दहशतवादी आहे, जो रस्ते, शाळा आणि रुग्णालये बनवतो. मोफत वीज देतो. पुढे ते म्हणाले की, याचा एक क्रम आहे, आधी राहुल गांधी म्हणाले मग पंतप्रधान मोदी त्यानंतर प्रियंका गांधी, सुखबीर बादल हे सर्वांचा मला दहशतवादी म्हणत आहेत. पंतप्रधान मोदी हे राहुल गांधींची नक्कल करतील, असे वाटले नव्हते. असे केजरीवाल म्हणाले.

सर्व पक्षांनी पंजाब लुटला : अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल म्हणाले, 'पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. 70 वर्षांपासून सर्वच पक्षांनी पंजाबला लुटले, मुलांना बेरोजगार केले. ते पुढे म्हणाले की, 'पंजाबवर 3 लाख कोटींचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. त्यांनी काही केले नाही तर हा पैसा गेला कुठे? शाळा बांधली नाही, दवाखाना बांधला नाही, कॉलेज बनवले नाही, काम केले नाही. मग हा कर्ज कशासाठी आहे. असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

'आप'ला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्नशील
केजरीवाल म्हणाले की, 'पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी आम आदमी पार्टी (आप) रिंगणात उतरली आहे. त्यामुळे विरोधकांना आता भीती वाटायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पार्टीचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, भाजप, अकाली दल या सर्वांनी एकत्र येऊन काम सुरू केले आहे. सगळे एकच भाषा बोलत आहेत आणि शिव्या देत असल्याचे केजरीवाल म्हणाले.

प्रत्येकजण आपापसात कॉन्फरन्स कॉल करतो: केजरीवाल

भगवंत मान यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजप आणि काँग्रेसला रोखायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी, राहुल गांधी, कॅप्टन अमरिंदर सिंग, चरणजित सिंग चन्नी आणि सुखबीर सिंग बादल हे सगळे एकत्र जमले आहेत. त्यांना भगवंत मान यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाहीत. ते पुढे म्हणाले की, 'असे दिसते की प्रत्येकजण रात्री बसतो आणि एकमेकांशी कॉन्फरन्स कॉल करतो.

दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये काम करू : केजरीवाल
केजरीवाल म्हणाले की, आमचे सरकार बनले तर आम्ही पंजाबमध्येही विकास करू. येथे प्रामाणिक सरकार आणले जाईल. संपूर्ण यंत्रणा आपल्या विरोधात उभी आहे. पंजाबचे 3 कोटी पंजाबी एकत्र येऊ शकत नाहीत का? ते कोणत्याही पक्षाचे असले तरी आपल्याला संपूर्ण व्यवस्थेचा पराभव करायचा आहे. यावेळी प्रामाणिक पंजाबला मतदान करा. असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...