आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली कंबर कसली असून, काँग्रेस हायकमांडकडून करण्यात येत असलेले सर्वेक्षणाचे काम देखील पूर्ण झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव अव्वल क्रमांकावर असल्याचे कळते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे रविवारी लुधियाना येथे औपचारिक घोषणा करणार आहेत.
यापूर्वी शनिवारी काँग्रेसने मुख्यमंत्री चन्नी यांचा निवडणुकीसाठीचा एक पोस्टर जारी केला होता. या पोस्टरची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. पुष्पा या चित्रपटाच्या पोस्टरप्रमाणे काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या निवडणूक प्रचाराचे पोस्टर तयार केले आहे. या पोस्टरवर काही ओळी लिहण्यात आल्या होत्या. 'तुम्ही ईडी लावा किंवा छापा मारा... चन्नी झुकेगा नही! हा पंजाबचा वाघ आहे.' असे निवडणुकीच्या पोस्टरवर लिहण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 'साड्डा चन्नी-साड्डा मुख्यमंत्री' म्हणजेच चन्नी आपला मुख्यमंत्री असे प्रचार देखील केले जात आहे.
काँग्रेसच्या वतीने चरणजीत सिद्धू यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत असल्याने नवजोत सिंह सिंधू नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावरुन नवजोत सिंधू यांनी काँग्रेस हायकमांडला धारेवर धरले आहे. पंजाबचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार असे भाकित गेल्या काही दिवसांपासून नवजोत सिंधू करत होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरू असून, सिंधू पार्टी सोडण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान शनिवारी सिंधू यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरुन भाष्य केले आहे. 60 आमदार असल्यावर मुख्यमंत्र्याची निवड केली जाईल. कोणीही 60 आमदारांवर बोलू शकत नाही. कोणीही मुख्यमंत्री आणि सरकारवर बोलू शकत नाही. माझा पंजाब मॉडेल हा मुलांना, तरुणांना आणि राज्याचे कायापलट करण्यासाठी असल्याचे सिद्धू म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.