आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Election 2022 Priyanka Gandhi Door To Door Campaign In Punjab: Priyanka Gandhi Campaign In Punjab For Assembly Polls | Marathi News

पंजाब विधानसभा 2022:पंजाबमध्ये प्रियंका गांधी यांचा आम आदमी पार्टीवर हल्लाबोल, म्हणाल्या- 'आप' ही आरएसएसची पार्टी

कोटकपूरा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी आज कोटकपूरा येथे जनतेला संबोधित केले. यावेळी प्रियंका गांधी यांनी आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार निशाणा साधला. सभेत प्रियंका गांधी यांनी आम आदमी पार्टीच्या दिल्ली मॉडलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याची तुलना भाजप सोबत केली. आम आदमी पार्टीला आरएसएसने तयार केली असून, दिल्लीत शैक्षणिक आणि आरोग्य संस्थांच्या नावावर काहीही नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. असे म्हणत प्रियंका गांधी यांनी आम आदमी पार्टीवर निशाणा साधला.

लोकांना संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, माझे लग्न पंजाबी कुटुंबात झाले आहे. माझ्या मुलांमध्ये पंजाबी रक्त आहे. यानंतर एका प्रश्नाच्या उत्तरात प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी माझा भाऊ राहुल गांधींसाठी जीव देऊ शकते आणि राहुल गांधी देखील माझ्यासाठी हे करू शकतात. संघर्ष भाजपमध्ये आहे, काँग्रेसमध्ये नाही. योगीजी, मोदीजी आणि अमित शहा यांच्यात हितसंबंधांचा संघर्ष असू शकतो. असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

काँग्रेसमधून बंडखोरी करत करत दुसऱ्या पक्षात गेलेले कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर देखील प्रियंकाने हल्लाबोल केला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंजाबमध्ये आमचे सरकार होते. मात्र त्याला दिल्लीतून चालवण्यात येत होते. अमरिंदर सिंह हे भाजपसोबत हातमिळवणी करत होते. हा रात्रीस चालणारा खेळ आता सर्वांच्या समोर आला आहे. त्यामुळेच आम्ही चन्नीला मुख्यमंत्री बनवले. असे म्हणत प्रियंका गांधी यांनी अमरिंदर सिंह यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वीच अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा देत आपला नवीन पक्ष पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली आहे. त्यात या विधानसभेला अमरिंदर सिंह यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.

मंचावरून प्रियंका गांधी यांनी सीएम चन्नी यांचे कौतुक केले आणि त्यांनी 100 दिवसात चांगले काम केल्याचे सांगितले. प्रियांका यांनी मंचावरून घोषणा केली की, त्यांचे सरकार स्थापन झाल्यास महिलांना दरमहा 1100 रुपये दिले जातील. यानंतर प्रियांका गांधी यांनी जय हिंद जय पंजाब आणि सत् श्री अकालने भाषणाचा समारोप केला.

14 फेब्रुवारीला होणार होती निवडणूक

पंजाबमध्ये सुमारे 32 टक्के अनुसूचित मतदार आहेत. 16 फेब्रुवारीला संत रविदास यांची 645 वी जयंती आहे. त्यामुळे पंजाबमधून लाखो भाविक गुरुच्या जयंती निमित्त बनारसच्या गोवर्धनपुर येथे जात असतात. गुरुंच्या जयंतीसाठी पंजाबमधील लाखो भाविक 13-14 फेब्रुवारीला स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून बनारसला रवाना होत असतात. त्यानंतर 17-18 फेब्रुवारीपासून या भाविकांच्या परतीचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर लाखो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले असते. त्यापार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख पुढे ढकलली असून, येत्या 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

या पक्षांनी केली होती मागणी

निवडणूक पुढे ढकल्याची सर्वात अगोदर मागणी बहुजन समाज पक्षाने केली होती. बसपाचे पंजाब प्रधान जसबीर गढी यांनी निवडणूकीचा कालावधीत 20 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकल्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी देखील पत्र देत निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकल्याची मागणी केली होती. त्यानंतर परिस्थिती पासून भाजपचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आणि पंजाब लोक काँग्रेस, शिरोमणि अकाली दल यांनी देखील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...