आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Election 2022 | Rahul Gandhi | Congress | Bjp | Aam Admi Party Punjab | Rahul Gandhi's Attack On 'Aap' Before Punjab Elections, Said Kejriwal Is Distrustful Of National Security

विधानसभा निवडणूक 2022:पंजाब निवडणुकीपूर्वी राहुल गांधींचा 'आप'वर हल्लाबोल, म्हणाले- केजरीवाल हे राष्ट्रीय सुरक्षेबाबत अविश्वासू

​​​​​​​चंडीगढ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब विधानसभेसाठी येत्या 20 फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यापार्श्वभुमीवर राजकीय पक्ष कसून प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने नेते राहुल गांधी देखील पंजाब विधानसभेच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले असून, त्यांनी आज आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल हे दहशतवाद्यांबाबत मवाळ असल्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत अविश्वासू असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, "काहीही झाले तरी, तुम्हाला काँग्रेसचा नेता कधीही दहशतवाद्याच्या घरी दिसणार नाही. मात्र आपचे नेते दहशतवाद्याच्या घरी जाऊन बसतात. हे सत्य आहे." असे म्हणत राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी केलेला हा आरोप केजरीवाल यांच्यावर मोठा हल्ला मानला जातो. 2017 च्या निवडणुकीदरम्यान केजरीवाल हे मोगातील एका खालिस्तानी दहशतवाद्याच्या घरी थांबले होते. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

केजरीवालवर हल्लाबोल करताना राहुल गांधींना दावा केला आहे की, सरकार बनवण्यासाठी "एक संधी" मागणारे पंजाब "उद्ध्वस्त" करतील आणि राज्य "जाळतील". पंजाब हे सीमावर्ती आणि संवेदनशील राज्य आहे. फक्त काँग्रेस पक्षच पंजाब समजून घेऊ शकतो आणि राज्यातील शांतता राखू शकतो. आम्हाला माहित आहे की, शांतता बिघडली तर इथे काहीही उरणार नाही. असे राहुल गांधी म्हणाले.

'आप'वर हल्लाबोल करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, आपसारखे पक्ष राज्यातील जनतेला 'एक संधी द्या' असे सांगत आहे. मात्र तेच पंजाबचा नाश करतील. पंजाब जाळतील, हे माझे शब्द लक्षात ठेवा. असे राहुल गांधी म्हणाले.

मोदींवर साधला निशाणा
राहुल गांधी यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, कॅप्टन भाजपशी संबंध वाढवण्याचे प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्ही त्यांना गेल्या वर्षी पक्षातून काढून टाकले. काँग्रेसला पंजाबमध्ये 70-80 जागा मिळून, बहुमत मिळेल. असे राहुल गांधी यांनी भाष्य केले.

चन्नींचे केले कौतुक

मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे यावेळी राहुल गांधी यांनी तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले की, चन्नी लोकांना प्रेमाने अभिवादन करतात आणि त्यांना मिठी मारतात, परंतु अमरिंदर सिंग यांना असे करताना कधीही पाहिले नाही. पुढे ते म्हणाले की, "तुम्ही अमरिंदर सिंग यांना कधी गरीब व्यक्तीला मिठी मारताना पाहिले आहे का, मी त्यांना असे करताना पाहिले नाही. आणि ज्या दिवशी मला कळले की, अमरिंदर सिंग आणि भाजपचे संबंध आहेत, तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांना काढून टाकले." असे राहुल गांधी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...