आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Election 2022 | State Assembly Election Punjab | Marathi News | Rahul Gandhi Critisize Modi And Kejriwal | If You Want False Promises, Then Listen To Modi, Kejriwal "Rahul Gandhi's Attack

मिशन पंजाब इलेक्शन:"खोटी आश्वासने पाहिजे असतील, तर मोदी, केजरीवालांना ऐका" राहुल गांधींचा हल्लाबोल

चंदीगढ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पंजाब राज्यात येत्या 20 फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षातील मंडळी प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. पंजाब भाजप, काँग्रेससह आम आदमी पार्टीने देखील आपली कंबर कसली आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर असून, पटियाला येथे जनतेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुखबीर सिंग बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासने देणाऱ्या नेत्यांवर राहुल गांधी यांनी टीका केली. ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय पक्ष खोटी आश्वासने देत आहे. मात्र, मी खोटी आश्वासने देणार नाही. तुम्हाला खोटी आश्वासने ऐकायची असतील तर मोदीजी, बादलजी आणि केजरीवालजींना ऐका. मला फक्त सत्य बोलायला शिकवले गेले आहे. असे म्हणत राहुल गांधींनी मोदी, केजरीवालसह सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्लाबोल केला.

अश्विनी कुमार यांचा काँग्रेसला राजीनामा

काँग्रेसला एकापोठापाठ एक झटके लागत आहे. अनेक जण पक्षाला सोडचिठ्ठी देत रामराम ठोकत आहे. आता पुन्हा एका वरिष्ठ नेत्यांने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे कुमार यांनी आपला राजीनामा सुपुर्द केला आहे. राजीनाम्यात अश्विनी कुमार यांनी लिहले आहे की, पक्षाबाहेर राहून राष्ट्रीय प्रश्नांवर अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकेल. याशिवाय कुमार यांनी पक्षाचे आभारही मानले आहेत.

अश्विनी कुमार यांनी आपल्या राजीनाम्यात लिहले आहे की, याप्रकरणी सर्व विचार करुन मी असे निर्णय घेतले आहे की, सध्याच्या परिस्थितीनुसार आणि माझ्या प्रतिष्ठेनुसार मी पक्षाच्या कक्षेबाहेर राहून राष्ट्रीय प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. पुढे कुमार म्हणाले की, 46 वर्षे पक्षाशी निगडीत राहिल्यानंतर स्वातंत्र्यलढ्याने दिलेले लोकशाहीचे वचन पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे पुढे जातील, या आशेने पक्ष सोडत आहे. असे अश्विनी कुमार यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

पंजाबमध्ये मोठा धक्का

आश्विनी कुमार हे पंजाब राज्यातून राज्यसभा खासदार होते. येत्या 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच आश्विनी कुमार यांनी राजीनामा दिल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो. कारण, आश्विनी कुमार हे सोनिया गांधी यांचे विश्वसनीय नेते होते. असे असतानाही कुमार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागल्या आहेत.

20 फेब्रुवारीला होणार मतदान
पंजाब विधानसभा निवडणूक येत्या 20 फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 20 फेब्रुवारीला निवडणूक झाल्यानंतर 10 मार्च रोजी मतमोजणी केली जाणार आहे. पंजाबमध्ये भाजप, काँग्रेससह आम आदमी पार्टीने देखील आपली कंबर कसली आहे.

बातम्या आणखी आहेत...