आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Elections 2022 Vs Former PM Dr. Manmohan Singh, Dr, Singh Accused PM Narendra Modi

माजी PM मनमोहन सिंहांची निवडणुकांमध्ये एंट्री:निवडणुकीच्या तोंडावर पहिला VIDEO रिलीज, म्हणाले- मी बोललो कमी, काम जास्त केले; मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील 5 राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीत माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचीही एंट्री झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अबोहर सभेपूर्वी त्यांनी व्हिडिओद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला. माजी पंतप्रधान म्हणाले की, मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा आहे. जो 'फोडा आणि राज्य करा' हे धोरण अवलंबतो.

डॉ.सिंह यांनीही चीनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. ते म्हणाले की, एक वर्षापासून चिनी सैन्य भारताच्या पवित्र भूमीवर बसले आहे. या सरकारचा संविधानावर विश्वास नाही. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. सरकार केवळ देशातच नाही तर परराष्ट्र धोरणाच्या मोर्च्यावरही अपयशी ठरले आहे.

मनमोहन सिंहांच्या व्हिडिओतील महत्त्वाच्या गोष्टी
1. महागाईने जनता हैराण झाली आहे

आज देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था एका बाजूला कोलमडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. दुसरीकडे 7 वर्षे सरकार चालवूनही केंद्र सरकार चुका मान्य करत नाही. लोकांच्या समस्यांसाठी ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत.

2. मी कमी बोललो आणि जास्त काम केले
पंतप्रधानपदाला विशेष महत्त्व आहे, असे माझे मत आहे. इतिहासाला दोष देऊन तुमचे पाप कमी होऊ शकत नाही. पंतप्रधान म्हणून काम करताना मी जास्त बोलण्याऐवजी कामाला प्राधान्य दिले. आम्ही राजकीय फायद्यासाठी देशाचे विभाजन केले नाही. सत्य झाकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.

3. चिनी कब्जाची चर्चा दडपली जात आहे
आपल्या पवित्र भूमीवर गेल्या एक वर्षापासून चिनी सैन्य ठाण मांडून आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुने मित्र आपल्यापासून दूर जात आहेत. शेजारी देशांशीही आपले संबंध बिघडत आहेत. मला आशा आहे की सत्तेत असलेल्यांना हे समजले असेल की बळजबरीने मिठी मारणे, फिरवणे किंवा निमंत्रण न देता बिर्याणी खाणे याने देशाचे संबंध सुधारू शकत नाहीत. 'सूरत बदलने से सीरत नहीं बदलती', हेही सरकारने समजून घेतले पाहिजे. सत्य नेहमी समोर येते.

4. पंजाबसाठी काँग्रेसच योग्य
डॉ.सिंह म्हणाले की, पंजाबमधील जनतेसमोर निवडणुकीच्या वातावरणात मोठी आव्हाने आहेत. त्यांचा योग्य मुकाबला करणे महत्त्वाचे आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांची समृद्धी आणि बेरोजगारी केवळ काँग्रेसच दूर करू शकते. पंजाबच्या मतदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणाले की, भारत आज एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. मला पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर येथील माझ्या बंधू-भगिनींसोबत देशातील आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्याची खूप इच्छा होती, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने मी ते असे संबोधित करत आहे.

5. सुरक्षेतील त्रुटींबद्दल पंतप्रधानांनी पंजाबची बदनामी केली
काही दिवसांपूर्वी पंजाबच्या सुरक्षेच्या नावाखाली पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि तेथील लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जे कोणत्याही प्रकारे योग्य मानले जाऊ शकत नाही.

6. शेतकरी चळवळीत पंजाबींची बदनामी केली
शेतकरी आंदोलनाच्या काळातही पंजाब आणि पंजाबियतला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. ज्या पंजाबींच्या शौर्याला, कतृत्त्वाला, देशभक्तीला आणि बलिदानाला साऱ्या जगाने सलाम केला आहे. त्यांच्या बाबतीत काय काय केले नाही. पंजाबच्या मातीत जन्मलेला एक सच्चा देशवासी या नात्याने मला याचे खूप दु:ख झाले.

7. आर्थिक धोरणांची समज नाही
कोणतीही आर्थिक समज नाही. चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिलांना त्रास होत आहे. देशातील अन्नदाते दान्या-दान्याचे मोहताज झाले आहेत. देशात सामाजिक विषमता वाढली आहे. लोकांवरील कर्ज वाढत असून उत्पन्न कमी होत आहे. श्रीमंत हे अधीक श्रीमंत होत आहे आणि गरीब अधिक गरीब होत आहे. सरकार आकडेवारीशी फसवणूक करून सर्वकाही बरोबर असल्याचे दाखवत आहे. सरकारच्या धोरणात आणि हेतूंमध्ये दोष आहे.

8. भाजप लोकांमध्ये फूट पाडत आहे
सरकार आपला स्वार्थ साधण्यासाठी जात, धर्म आणि प्रदेशाच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहे. त्यांना आपापसात लढवले जात आहे. केंद्र सरकार फोटा आणि राज्य करा चे राजकारण करत आहे.

बातम्या आणखी आहेत...