आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Elections 2022 Vs PM Narendra Modi Rally In Punjab Abohar Today | Marathi News| Punjab Elections 2022

नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल:म्हणाले-"असे एकही गाव नाही जिथे यूपी-बिहारचे लोकं नाहीत; संत रविदास हे देखील यूपीचे होते, त्यांनाही काढणार का?"

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 20 फेब्रुवारीला पंजाब विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षातील दिग्गज नेते पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रचाराच्या रिंगणात उतरले असून, त्यांनी आज अबोहर येथे जनतेला संबोधित केले. त्यावेळी मोदींनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर टीकास्त्र केले. काँग्रेसने नेहमी दोन भागातील नागरिकांमध्ये भांडणं लावण्याचे काम केले आहे. असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याने यूपी, बिहारच्या जनतेविरोधात भाष्य केले होते, आणि राहुल गांधींनी देखील त्या वक्तव्यावर टाळ्या वाजवल्या होत्या. हे संपूर्ण देशाने बघितले आहे. या भाष्यामुळे कोणाचे अपमान केले जात आहे? असा प्रश्न देखील मोदींनी विचारला.

पुढे मोदी म्हणाले की, "येथे असे एकही गाव नसेल, जिथे उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील आमचे भाऊ-बहिणी कष्ट करत नसतील. कालच आम्ही संत रविदासजींची जयंती साजरी केली. संत रविदासजींचाही जन्म उत्तर प्रदेशातील बनारसमध्ये झाला. काँग्रेस म्हणते उत्तर प्रदेशातील बांधवांना येऊ देणार नाही. लोक श्री गुरु गोविंद सिंग यांचा अपमान करत आहेत?' असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र केले.

मोदींचे अबोहर सभेतील भाषणातील 3 महत्त्वाच्या गोष्टी

1. शेतकरी मला नक्कीच आशीर्वाद देतील
पंजाबमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी म्हणून 3700 कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये 23 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. शेतकरी मला नक्कीच आशीर्वाद देतील. पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण देशात सर्वत्र आयुष्मान भारत योजनेतून उपचार केले जातात. दिल्ली सरकार या योजनेशी संबंधित नाही. पंजाबच्या लोकांना दिल्लीत वैद्यकीय सुविधा मिळत असतील तर त्यांच्या पोटात उंदीर का धावत आहेत. जे पंजाबच्या लोकांना दिल्लीत येऊ देत नाहीत, ते पंजाबमध्ये मत का मागत आहेत?

2. प्रत्येक व्यवसाय माफियांच्या ताब्यात
पंजाबमधील प्रत्येक व्यवसाय माफियांच्या ताब्यात आहे. पुढे मोदी म्हणाले की, आज पंजाबमधील प्रत्येक व्यवसाय माफियांच्या ताब्यात असून, व्यापारी माफियांच्या भितीने जगत आहेत. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. राज्यातील असुरक्षितता आणि चुकीच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. तरुणांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे येथे कोणी यायला तयार नाही. येथे आल्यानंतर त्यांना माफियांच्या आश्रयाला जावे लागणार आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही ते बदलू. असे मोदी म्हणाले.

2. एक संधी द्या, वाळू आणि ड्रग माफिया संपतील
मोदी म्हणाले की, संपूर्ण पंजाबमध्ये एकच आवाज आहे तो म्हणजे यावेळी भाजपला जिंकवायचे आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर सर्वात वेगवान विकास पंजाबमध्ये होणार आहे. यामुळे वाळू आणि ड्रग माफियांचा संपतील. तसेच पंजाबमध्ये औद्योगिक विकास देखील होईल. मोदी यावेळी पंजाबच्या जनतेला संधी मागितली आहे.

चार दिवसांत पंतप्रधानांची तिसरी सभा
पंजाबमध्ये प्रचारासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली आहे. गेल्या चार दिवसांत मोदींनी पंजाबमध्ये तिसरी प्रचार रॅली घेतली आहे. यापूर्वी मोदींनी जालंधर आणि पठाणकोटमध्ये जनतेला संबोधित केले. पंजाब निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या, 18 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर प्रचार थांबणार आहे. पंजाबमध्ये येत्या 20 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालंधरच्या सभेत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला. मोदींनी हत्याकांडासाठी काँग्रेसला जबाबदार धरले. त्यानंतर पठाणकोटच्या सभेत ते म्हणाले की, काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली तर पंजाबची सुरक्षा धोक्यात येईल. श्री करतारपूर साहिबच्या निमित्ताने त्यांनी काँग्रेसलाही घेरले. पंतप्रधान म्हणाले की काँग्रेसला 3 संधी मिळाल्या, पण त्यानी अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्तारपूरला भारतात ठेवले नाही.

पंतप्रधानांनी आम आदमी पार्टीला काँग्रेसची कार्बन कॉपी म्हटले आहे. मोदी म्हणाले की, काँग्रेससोबत मिळून आपने सरकार स्थापन केले आहे. त्यांनी दिल्लीच्या गल्लीबोळात ठेके उघडलेत, त्यामुळे त्यांच्याकडून पंजाबमधील ड्रग्ज संपेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. असे म्हणत मोदींनी आपवर हल्लाबोल केला.

बातम्या आणखी आहेत...