आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमधील सरकारी कार्यालयांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. येत्या 2 मे पासून सर्वच सरकारी कार्यालये सकाळी साडे 7 वा. उघडतील व दुपारी 2 वा. बंद होतील. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासंबंधीचे आदेश जारी केलेत. हा आदेश 15 जुलै 2023 पर्यंत लागू राहील.
CM मान यांनी सांगितले की, हा निर्णय लागू करण्यापूर्वी सरकारने नागरिकांशी सल्लामसलत केली. ऊन वाढण्यापूर्वीच सरकारी काम आटोपून आपापल्या कामावर परतण्याची त्यांची इच्छा आहे.
कर्मचाऱ्यांनीही सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. दुपारी उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी त्यांनाही घरी परतता येईल व कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
PSPCL वरील लोड कमी होणार
CM मान यांनी सांगितले की, PSPCL ने सरकारला सांगितले आहे की, पीक लोड दुपारी दीड ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असतो. त्यामुळे सरकारी कार्यालये दुपारी 2 वा. बंद करून सर्वच पंखे, बल्ब, कुलर व एसी बंद केली तर पीक लोक 300 ते 350 मेगावॅटपर्यंत कमी होईल.
ही पद्धत परदेशांतही राबवली जाते. कॅनडा-अमेरिकेतील लोक सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. यासाठी दर 6 महिन्याला ते घड्याळाची वेळ बदलून 1 तास मागे करतात. हे सर्वकाही सूर्योदयाच्या वेळेनुसार केले जाते.
CM म्हणाले - सकाळी साडे 7 वा. कार्यालयात पोहोचणार
सीएम मान म्हणाले - भारतात प्रथमच ही पद्धत अंमलात आणली जात आहे. ती सर्वांना आवडेल अशी आशा आहे. सरकारी कर्मचार्यांना त्यांच्या कोणत्याही कौटुंबिक समारंभात/वैयक्तिक समारंभाला जायचे असेल, तर ते कोणतीही काळजी न करता सहज जाऊ शकतात. सकाळी 7.30 वाजता आपणही कार्यालयात पोहोचणार असल्याचे मान यांनी सांगितले. भविष्यात या अनुभवाचा अधिकाधिक फायदा घेण्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.