आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mohali Jasneet Kaur Instagram Influencer Arrested; Extort Money From Social Media | Nude Photos | Punjab

इन्स्टा स्टार बनली ब्लॅकमेलर:न्यूड फोटो, हनी ट्रॅपच्या जाळ्यात बड्या लोकांना अडकवायची जसनीत कौर, इन्स्टाग्राम स्टारला अखेर बेड्या

लुधियाना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पंजाबमध्ये जसनीत कौर नावाच्या एका महिलेची खूप चर्चा आहे. ती इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. इन्स्टाग्रामवर तिच्या प्रत्येक फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो. ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. मात्र, जसनीत कौरने आपल्या लोकप्रियतेच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केल्याने तिची जास्त चर्चा सुरू आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करायची अश्लील फोटो

पूर्वी ती स्वत:चे नॉर्मल फोटोच इन्स्टाग्रामवर शेअर करत असे. यात तिचे सौंदर्य आणि मोहक अदा स्पष्ट दिसायच्या. पण नंतर तिने इन्स्टाग्रामवर थेट अश्लील फोटो पोस्ट करायला सुरुवात केली. जसनीत कौर तिच्या अश्लील व्हिडिओ आणि फोटोंमुळे प्रसिद्ध होऊ लागली. आणि मग तिने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली. आधी ती लोकांशी मैत्री करायची आणि नंतर ब्लॅकमेलिंगचा घाणेरडा खेळ सुरू करायची. जसनीत आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून लोकांकडून मोठी रक्कम वसूल करत होती, असा आरोप आहे. जो कोणी तिला पैसे देण्यास नकार द्यायचा, त्याला ती गुंडांची धमकी देऊ लागली.

जसनीत आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून लोकांकडून मोठी रक्कम वसूल करत होती, असा आरोप आहे.
जसनीत आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून लोकांकडून मोठी रक्कम वसूल करत होती, असा आरोप आहे.

इन्फ्लुएन्सरची कशी झाली ब्लॅकमेलर​​​​​​?

जसनीत कौर या पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच जसनीत कौर मोठी स्वप्ने पाहू लागली. मात्र, काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे तिने पैसे कमावण्यासाठी इन्स्टाग्रामवर पॉर्न रील्स बनवायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढू लागले. येथूनच ती ब्लॅकमेलिंगच्या व्यवसायात उतरली.

राजकारणी मित्राची झाली मदत

यादरम्यान जसनीतची एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याशी मैत्री झाली. तो नेताही जसनीतला या कामात मदत करू लागला. जसनीतने आपल्या काळ्या धंद्यात इतका पैसा कमावला की तिने एक महागडी BMW कारही घेतली. ज्याची किंमत तब्बल 75 लाख रुपये आहे. एवढेच नाही तर या व्यवसायात असल्याने तिचे अनेक माफियांशीही संबंध होते. यांच्या जोरावरच ती लोकांना धमकावू लागली.

लुधियानाच्या एका बिझनेसमनने दिलेल्या तक्रारीमुळे जसनीत कौरच्या ब्लॅकमेलिंगचे प्रकरण समोर आले.
लुधियानाच्या एका बिझनेसमनने दिलेल्या तक्रारीमुळे जसनीत कौरच्या ब्लॅकमेलिंगचे प्रकरण समोर आले.

जसनीत कौरला अटक कशी झाली?

माफियांच्या सपोर्टमुळे जसनीतचा आत्मविश्वास दुणावला होता. ती मोठमोठ्या लोकांना सहज टार्गेट करू लागली. दरम्यान, तिने लुधियानाचे बिझनेसमन गुरबीर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. ती त्यांना ब्लॅकमेल करू लागली. तिने बिझनेसमनकडे एक कोटींची मागणी केली. गुरबीर तिला काही घाबरले नाहीत. यानंतर जसनीतने गुरबीर यांना गुंडांकडून धमक्या देण्यास सुरुवात केली. पण तरीही गुरबीर बधले नाहीत. त्यांनी थेट लुधियानाचे मॉडेल टाऊन पोलिस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांना सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी पकडले तेव्हा जसनीत कौर मीडियापासून आपला चेहरा अशा प्रकारे लपवताना दिसली.
पोलिसांनी पकडले तेव्हा जसनीत कौर मीडियापासून आपला चेहरा अशा प्रकारे लपवताना दिसली.

जसनीत कौरला मोहालीमधून अटक

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास करत जसनीतचा शोध सुरू केला. पोलिसांनी तिच्या शोधात अनेक ठिकाणी छापे टाकले. अखेर आता पोलिसांनी जसनीत कौरला मोहालीतून अटक केली. तिची अटक हे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. जसनीतने आतापर्यंत किती लोकांना बळीचा बकरा बनवले आहे, याचा तपास केला जात आहे.

काँग्रेस नेते लकी संधू. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसनीतच्या सांगण्यावरून लकीनेच गुंडांकरवी व्यावसायिकाला धमकावले होते.
काँग्रेस नेते लकी संधू. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसनीतच्या सांगण्यावरून लकीनेच गुंडांकरवी व्यावसायिकाला धमकावले होते.

जसनीतचा मित्र काँग्रेस नेता फरार

मिळालेल्या माहितीनुसार, जसनीतच्या साथीदाराचाही पोलीस शोध घेत आहेत. आता त्याला पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. दोन दिवसांच्या कोठडीत जसनीतची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातून अनेक मोठे खुलासे होऊ शकतात, असे मानले जात आहे. इतर लोकांसोबत केलेल्या ब्लॅकमेलिंगचा शोध घेण्यासाठी पोलीस तिच्या इंस्टाग्राम अकाउंटचीही तपासणी करत आहेत. लुधियाना पोलिसांनी जसनीतचा सहकारी लकी संधू, जो युवक काँग्रेसचा नेता आहे, त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, संधू संभाव्य टार्गेट असलेल्या व्यक्तींना धमकीचे फोन करत असे, ज्यांना जसनीत पैशांसाठी ब्लॅकमेल करायची.

लकी संधू हा एक प्रसिद्ध चेहरा असून तो युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदासाठी निवडणुकीची तयारी करत आहेत. संधू सध्या फरार आहे, मात्र त्याला लवकरच पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 384 (खंडणी), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जसनीतने आतापर्यंत किती लोकांना बळीचा बकरा बनवले आहे, याचा तपास केला जात आहे.
जसनीतने आतापर्यंत किती लोकांना बळीचा बकरा बनवले आहे, याचा तपास केला जात आहे.