आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:वकील महाशयांची रात्री सप्तपदी; पण सकाळी पक्षकाराच्या जामिनासाठी लांबवली विदाई!

नवी दिल्ली | पवन कुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यायमूर्तींनी केले वकिलाच्या कर्तव्यकठाेर गुणाचे काैतुक, आराेपीला जामीनही

वकील आपल्या पक्षकाराला खटला जिंकून देण्यासाठी काय करत नाहीत? हे आपण नेहमीच पाहताे. परंतु चंदीगडमधील एका वकिलाची कृती लक्षवेधी ठरली नसती तरच नवल. वकिलाने स्वत:च्या लग्नानंतर विदाईची घटिका केवळ पक्षकाराला अंतरिम जामीन मिळावा म्हणून लांबवली. लग्नाची ही कथा पंजाब अँड हरियाणा हायकाेर्टासमाेर प्रकरण आले तेव्हा समाेर आली...

न्यायमूर्ती अरुण माेंगा यांच्या पीठासमाेर हा खटला हाेता. प्रकरणातील आराेपी अंग्रेज सिंहने उच्च न्यायालयातील वकील लुपिल गुप्ता यांना आपली केस लढवण्यासाठी नियुक्त केले हाेते. लुपिल यांचा विवाह २७ आॅक्टाेबरच्या रात्री झाला हाेता. म्हणजे लुपिल नुकतेच रेशीमबंधनात अडकलेले हाेते. परंतु विवाह समारंभादरम्यान लुपिल यांना आपल्या पक्षकाराची केस दुसऱ्या दिवशी हायकाेर्टासमाेर येणार असल्याची माहिती मिळाली. लुपिल यांना वाटले असते तर त्यांनी इतर वकिलास पाठवून सुनावणी पुढे ढकलावी यासाठी काेर्टाला विनंती करू शकत हाेते. परंतु ते स्वत:च बाजू मांडण्यासाठी न्यायालयात पाेहाेचले. त्यासाठी त्यांनी सकाळी आधी वधूच्या कुटुंबाला काेर्टात जाऊ देण्याची विनंती केली. त्यासाठी विदाई काही वेळासाठी थांबवावी, असे सांगितले. सासुरवाडीच्या लाेकांनीही जावईबापूंचे म्हणणे मान्य केले.

या प्रकरणाची सुनावणी व्हिडिआे काॅन्फरन्सिंगद्वारे झाली. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर अंग्रेज सिंह विरुद्ध पंजाब सरकारची केस सुनावणीसाठी आली. पंजाब सरकारकडून एएजी पीएस वालियांनी बाजू मांडण्यासाठी सुनावणी टाळण्याचा आग्रह केला. आम्ही व्यग्र असल्यामुळे जबाब दाखल करण्यासाठी वेळ हवा, असे त्यांनी सांगितले. त्यास लुपिल यांनी आक्षेप घेतला. केस दाखल हाेऊन एक वर्ष पाच महिने लाेटले आहेत.

पाेलिसांनी चालान सादर केलेले नाही. हा विलंब लक्षात घेऊन आराेपीला अंतरिम जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद लुपिल यांनी केला. येथे व्यग्रतेचा मुद्दा आला. परंतु माझ्यापेक्षाही तुम्ही जास्त व्यग्र असाल का? माझा रात्री विवाह झालाय. मी पत्नीची डाेली थांबवली आहे. येथे भल्या सकाळपासूनच रांगेत प्रतीक्षा करत आहे. आता कुठे सुनावणी सुरू झालीये, तर तुम्ही ती पुढे ढकलू इच्छिता.’ हा लुपिल यांचा युक्तिवाद एेकल्यानंतर काेर्टाने आराेपीस जामीन दिला. न्यायमूर्ती माेंगा यांनी वकील लुपिल यांना नव्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबराेबर कर्तव्यकठाेर गुणाचेही काैतुक केले.