आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुलवंत कौर पोलिसांच्या छळाला बळी पडत १६ वर्षे बेडवर पडून राहिली. न्याय मागत राहिली, पत्र लिहीत राहिली... पण अखेर तिने शुक्रवारी आपले प्राण सोडले. मात्र, मरतानाही ती न्यायाची प्रतीक्षा करत राहिली. शेवटच्या श्वासापर्यंत ती पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागत राहिली. या प्रकरणात अनेक वेळा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी झाले. मात्र, पोलिस अधिकारी कारवाई करण्याऐवजी प्रकरण दाबत राहिले. कुलवंत कौरला न्याय देण्यासाठी सरबजित कौर मानुकेसह पंजाबच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटीपर्यंत विश्वास देण्यात आला. मात्र, कुलवंत कौरला अखेरपर्यंत न्याय मिळाला नाही आणि शुक्रवारी तिचे निधन झाले.
प्रकरण असे २००५ मध्ये जगराओत एका अल्पवयीन मुलीचा संशयित स्थितीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात इक्बालसिंहला अटक केली होती. यानंतर इक्बालचे निर्दाेषत्व सिद्ध झाले. मात्र, चौकशीदरम्यान पोलिसांच्या अत्याचारामुळे इक्बाल यांच्या बहिणीचे आयुष्य खडतर झाले. न्यायासाठी आतापर्यंत हजारो आरटीआय करून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता बहीण या जगात राहिली नाही.
टॉर्चरमुळे अपंग झाली होती कुलवंत कौर, शरीराचे पिंजऱ्यात रूपांतर झाले होते आपल्या बहिणीला न्याय देण्यासाठी टक्केटोणपे खाल्लेल्या रसूलपूरच्या इक्बालसिंगाने सांगितले की, पोलिस अधिकारी स्वत:ला वाचवण्यासाठी जोर लावत होते. अनुसूचित जाती आयोगाने २८ मे रोजी एसएसपीला आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश जारी केले होते आणि कारवाईचा अहवाल १५ दिवसांत मागितला होता. मात्र, असे काही झाले नाही. इक्बालने सांगितले की, २१ जुलै २००५ मध्ये ठाणे अमलदाराने सांगितले की, त्याला व कुटुंबातील लोकांना ताब्यात घेऊन अत्याचार केले. याआधी १४ जुलै रोजी आई व बहिणीला ठाण्यात जाऊन कुलवंत कौरना विजेचा शॉक देऊन तिला अपंग केले आणि आपली चूक झाकण्यासाठी २२ जुलैला तिला खुनाच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवले. मात्र, २८ मार्च २०१४ रोजी तिला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. इक्बालही निर्दाेष झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.