आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांगलच्या फॅक्ट्रीत गॅस गळती:शाळेतील मुलासंह परिसरातील लोकांना घसा- डोकेदुखीचा त्रास, अनेक जण रुग्णालयात दाखल

खरर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब आणि हिमाचल सीमेवर असलेल्या नांगल शहरात गुरुवारी एका कारखान्यातून गॅसची गळती झाली. त्यामुळे लहान मुले आणि काही लोकांना घसा दुखणे आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नजीकच्या शाळेतील 7 मुलेही या गॅस गळतीच्या तडाख्यात अडकले आहेत. ​​​​​​प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून शाळकरी मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पोलि आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी नांगल येथे पोहोचले आहेत. इतर विभाग आणि आरोग्य विभागाच्या पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी गॅसची गळती झाली, तेथे 300 ते 400 लोक सातत्याने उपस्थित असतात

गॅस गळतीच्या घटनेचा फोटो.....

जखमी मुलाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत आहे.
जखमी मुलाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत आहे.
गॅस गळतीनंतर एक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि लोकांची गर्दी झाली.
गॅस गळतीनंतर एक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि लोकांची गर्दी झाली.

जिल्हा मुख्यालयापासून 25 KM अंतरावर अपघात
हा अपघात रोपड जिल्हा मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या नांगल येथे हा अपघात झाला. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. याआधी या अपघाताची माहिती पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी ट्विट करून दिली होती.

त्यांनी लिहिले की, परिस्थिती पाहता परिसरातील सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. ते स्वतः देखील या ठिकाणी पोहोचतील. प्राथमिक माहितीनुसार, गॅस गळतीमुळे लहान मुले आणि काही जणांना घसा दुखणे, डोकेदुखी आदी त्रास होऊ लागल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.