आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबच्या नवीन मुख्यमंत्री पदी शिख दलित समुदायातून असलेले चरणजीत सिंग चन्नी यांची निवड झाली. पंजाबमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चन्नी विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यात महिला IAS अधिकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज करणे आणि त्यानंतर झालेल्या MeToo च्या आरोपांमुळे ते वादात सापडले होते. यासोबतच, पोस्टिंग करण्यासाठी टॉस करण्याच्या पद्धतीवर सुद्धा ते चांगलेच चर्चेत होते.
पंजाबचे नवे मुख्यमंत्री आणि वाद
टॉस करून पोस्टिंग : चरणजीत चन्नी त्यावेळी शिक्षण मंत्री होते. 3 वर्षांपूर्वी पॉलिटेक्निक इंस्टिट्यूटमध्ये भरती केली होती. प्राध्यापक पदासाठी दोन उमेदवार एकाच जागेवर पोस्टिंगसाठी इच्छुक होते. त्यावेळी चन्नी यांनी टॉस करून कुणाची पोस्टिंग पसंतीच्या ठिकाणी होणार याचा निर्णय घेतला होता.
IAS अधिकाऱ्याला मेसेजः 2018 मध्ये चन्नी यांनी एका महिला IAS अधिकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठवला असे आरोप करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चन्नी यांना जाहीर माफी मागण्यास सांगितले होते. यानंतर प्रकरण मिटले असेही कॅप्टन यांनी म्हटले होते. त्यातच यावर्षी पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने ते पुन्हा चर्चेत आले.
ग्रीन बेल्ट तोडून रस्ताः 2018 मध्येच चन्नी मंत्री बनल्यानंतर ज्योतिषच्या सल्ल्यावरून त्यांनी सरकारी घराचा नकाशाच बदलला. राजकारणात यशस्वी होण्यासाठी त्यांनी चंदीगड येथील घराचा प्रवेश मार्ग पूर्वेच्या दिशेने केला. यासाठी त्यांना ग्रीन बेल्टचे नियम मोडावे लागले. यानंतर स्थानिक प्रशासनाने तो रस्ता बंद करून पुन्हा ग्रीन बेल्ट स्थापित केला.
हत्तीची सफरः राजकारणात यश मिळविण्यासाठी चन्नी यांनी खरड येथील आपल्या घरात हत्तीच्या पाठीवर बसून फेरफटका मारला होता. असे केल्यास ते पंजाबचे मुख्यमंत्री होऊ शकतात असे त्यांच्या ज्योतिषने सांगितले होते.
पॅचवर्कचे विधान: चन्नी काही काळासाठी विधानसभेत विरोधीपक्ष नेते सुद्धा होते. त्यावेळी अकाली आणि भाजप युतीचे सरकार होते. सुखबीर बादल उपमुख्यमंत्री होते. सुखबीर यांनी विधानसभेत चन्नी यांना प्रश्न केला होता. 2002 ते 2007 मध्ये कॅप्टन सरकारने कोणती विकासकामे केली? त्यावर कॅप्टन साहेबांनी पूर्ण पंजाब राज्यात रस्त्यांचे पॅचवर्क केले असे चन्नी उत्तरले होते.
Phd प्रवेश परीक्षेत अपात्र: चन्नी यांनी 2017 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस या विषयावर PhD करण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यावेळी राजकीय फायद्यासाठी त्यांनी पंजाब विद्यापीठात SC/ST उमेदवारांसाठी नियमांत सूट दिली होती असे आरोप करण्यात आले. परंतु, प्रवेश परीक्षेत ते पात्र ठरू शकले नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.