आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरिंदर सिंह यांची नव्या पक्षाची घोषणा:कॅप्टनने सोडली काँग्रेस, सोनिया गांधीकडे राजीनामा पाठवला; पंजाब लोक काँग्रेस या नव्या पक्षाची केली घोषणा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी आज नव्या पक्षाची घोषणाही केली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव पंजाब लोक काँग्रेस (PLC) जाहीर केले आहे.

कॅप्टन यांनी आपला राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला आहे. कॅप्टन यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष सिद्धू यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले- सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करून पक्षाने योग्य काम केले नाही. पक्षाला एक दिवस पश्चाताप होईल.

कॅप्टन 15 काँग्रेस आमदारांच्या संपर्कात?

काँग्रेसमधील दिग्गज मंत्री देखील कॅप्टनसोबत पक्षात समिल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन 15 आमदारांच्या संपर्कात आहे.

पत्नी देखील राजकारण सक्रिय

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंह यांची पत्नी परनीत कौर या देखील राजकारण आता सक्रिय झाल्या आहेत. परनीत खासदार असल्याने राजकारणात त्यांचा चांगला दबदबा आहे. त्यामुळे अमरिंदर यांच्या नव्या पक्षात परनीत यांची भुमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.

बीजेपीसाठी फायदा?

पंजाबच्या राजकारणात अद्यापपर्यंत भाजपला स्थान मिळालेले नाही. आतापर्य़ंत भाजप अकाली दलासोबत सत्तेत आहे. पंजाबमध्ये बीजीपेला एक शक्तीशाली व्यक्ती महत्त्वाची गरज असून, ते अद्याप मिळालेले नाही. मात्र भाजपला अमरिंदर सिंह सारख्या नेत्याची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपला पंजाबमध्ये मोठा फायदा होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...