आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बचत:पंजाब : कार्यालये सकाळी 7.30 ते 2 पर्यंत सुरू राहणार!

चंदीगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबची सर्व सरकारी कार्यालये सुरू होण्याची वेळ २ मेपासून बदलणार आहे. २ मे ते १५ जुलैपर्यंत सर्व सरकारी कार्यालये सकाळी ७.३० पासून दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहतील. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, सरकारने हा निर्णय लोकांशी केलेल्या चर्चेनंतर घेतला आहे. राज्यात विजेचा खप म्हणजे पीक लोड दुपारी दीडपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत असतो, असे पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे. सरकारी कार्यालये २ वाजेपर्यंत बंद झाल्यास पंखे, बल्ब, कूलर, एसी बंद झाल्याने पीक लोड ३०० ते ३५० मेगावॅटपर्यंत कमी होईल. ही पद्धती परदेशातही स्वीकारली जाते. विजेची बचतही होईल.