आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबच्या श्री मुक्तसर साहिबचे पोलीस आता लोकांच्या लग्नसोहळ्यात बँड वाजवणार आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनी लग्न समारंभांचे बुकिंगही सुरू केले आहे. 1 तासासाठी 7 हजार रुपये आकारले जातील. श्री मुक्तसर साहिबचे एसएसपी हरमनदीप सिंग गिल यांनी यासाठी एक परिपत्रकही जारी केले आहे.
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, मोठमोठ्या सरकारी कार्यक्रमात अनेकदा लोक पोलीस बँडची धून ऐकत असत. पोलिसांचा बँड केवळ खास प्रसंगी वाजवला जातो, पण आता पंजाब पोलिसांचा बँड कोणत्याही लग्नात किंवा इतर कार्यक्रमात वाजताना दिसणार आहे.
परिपत्रक जारी
याबाबत मुक्तसर पोलिसांच्या वतीने परिपत्रक जारी करून शहरवासियांना कळविण्यात आले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, मुक्तसर पोलिस बँड घरगुती कार्यक्रमांसाठी देखील बुक केले जाऊ शकतो. परिपत्रकानुसार, कोणत्याही सरकारी किंवा खासगी व्यक्तीला पोलिस बँड बुक करता येईल.
पोलीस बँडचा बुकिंग दर
मुक्तसर पोलिसांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार पोलिस बँडच्या बुकिंगसाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. हे दर प्रति तासाचे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना एका तासाच्या बुकिंगसाठी पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत. खासगी कर्मचारी आणि सर्वसामान्यांकडून एका तासासाठी सात हजार रुपये आकारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक अतिरिक्त तासासाठी सरकारी कर्मचाऱ्याकडून 2,500 रुपये आणि जनतेकडून 3,500 रुपये आकारले जातील.
बँड बुकिंगसाठी मोबाइल क्रमांक
याशिवाय पोलीस लाईन ते समारंभापर्यंत प्रवास करण्यासाठी बुकिंग करणाऱ्या व्यक्तीकडून प्रति किलोमीटर 80 रुपये आकारले जातील. पोलीस बँड बुकिंगसाठी पोलीस नियंत्रण कक्ष किंवा पोलीस लाईनशी संपर्क साधता येईल. याशिवाय बँड बुकिंगसाठी मोबाईल क्रमांकही देण्यात आला आहे. 80549-42100 वर संपर्क करून बँड बुक करता येतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.