आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:पंजाबचा 35 वेळा 190+ चा स्काेअर; 16 वा विजय साजरा, काेलकाता संघाच्या आशेवर फेरले पाणी

माेहाली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर अर्शदीप सिंग (३/१९) आणि भानुका राजपक्षेने (५०) शनिवारी पंजाब किंग्ज संघाचा १६ व्या सत्रातील आयपीएलमध्ये विजय साजरा केला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने लीगमधील आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये नितीश राणाच्या काेलकाता नाइट रायडर्स टीमचा पराभव केला. पंजाब संघाने डीएलनुसार ७ धावांनी सामना जिंकला. यासह पंजाब संघाने आयपीएलच्या आपल्या करिअरमध्ये १९०+ धावसंख्येवर १६ वा विजय साजरा केला. यादरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे काेलकाता संघाच्या विजयी सलामीच्या आशेवर पाणी फेरले गेले. याचाच फायदा यजमान पंजाब संघाला झाला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने आपल्या घरच्या मैदानावर निर्धारित २० षटकांमध्ये ५ बाद १९१ धावा काढल्या.

प्रत्युत्तरात काेलकाता संघाने १६ षटकांत ७ बाद १४६ धावा काढल्या हाेत्या. यादरम्यान पावसाचे आगमन झाले. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार काेलकाता संघाला १६ षटकांत विजयासाठी १५४ धावांचे टार्गेट देण्यात आले. मात्र, टीमने १४६ धावा काढल्या हाेत्या. पंजाब किंग्ज संघाच्या फलंदाजांची घरच्या मैदानावरील कामगिरी लक्षवेधी ठरली. संघाच्या पाच फलंदाजांनी १५४+ स्ट्राइक रेटने तुफानी खेळी केली. सलामीवीर प्रभसिमरनने १२ चेंडूंत २३ धावा काढल्या.

कर्णधार शिखर धवन आणि भानुका राजपक्षेने दुसऱ्या विकेटसाठी ५४ चेंडंूमध्ये ८६ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी संघाच्या धावसंख्येला गती दिली. यादरम्यान धवनने ४० धावांची खेळी केली. तिने जितेश शर्माने २१ धावांचे याेगदान दिले. १८ काेटी रुपयांत करारबद्ध झालेल्या सॅम कॅरेनची १७ चेंडंूत दाेन उत्तंुग षटकारांतून केेलेली नाबाद २६ धावांची खेळी लक्षवेधी ठरली. यादरम्यान पंजाबकडून गाेलंदाज सुनील नरेन सलग दुसऱ्या सत्रामध्ये महागडा ठरला. त्याने पहिल्यांदाच ४० धावा दिल्या आहेत.

पंजाबला सलग दुसऱ्या विजयाची संधी : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने यंदाच्या सत्रातील आयपीएलमध्ये दमदार सुरुवात केली. शानदार विजयी सलामी देणारा पंजाब संघ आत येत्या बुधवारी लीगमधील आपला दुसरा सामना खेळणार आहे. यादरम्यान पंजाब आणि राजस्थान राॅयल संघ समाेरासमाेर असतील. काेलकाता व बंगळुरू यांच्यात ६ एप्रिल राेजी ईडन गार्डन मैदानावर सामना हाेणार आहे.