आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पंजाब सीमेवर एके-47 रायफल्स, पिस्तूल जप्त

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमा सुरक्षा दलाने रविवारी भारत-पाकिस्तान सीमेवर केलेल्या कारवाईत दाेन एके-४७ रायफल्स व पिस्तूल जप्त केले. ही कारवाई पंजाब प्रांतात करण्यात आली.

रविवारी दुपारी बाराच्या सुमारास फिराेजपूर जिल्ह्यातील चांदीवाला गावात बीएसएफला ही शस्त्रे एका पाकिटात आढळून आली. या पाकिटात दाेन रायफल्स, दाेन पिस्तूल तसेच ४० काडतुसे हाेती, अशी माहिती सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यात रविवारी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सरहाली येथे फेकण्यात आलेल्या आरपीजी बॉम्बला निकामी केले. याप्रकरणी एनआयएने तपास हाती घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...