आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबच्या परिवहन मंत्र्यांची स्टंटबाजी:हायवेवर चालत्या वाहनाच्या सनरूफमधून बाहेर आले; 2 गार्डचा जीव धोक्यात घातला

चंदीगड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबचे परिवहन मंत्री लालजीत सिंह भुल्लर यांचा धोकादायक स्टंट समोर आला आहे. ते त्यांच्या एंडेव्हर वाहनाच्या सनरूफमधून बाहेर निघत हात हलवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ राष्ट्रीय महामार्गावरील सांगण्यात येत आहे. गाडी भरधाव वेगाने जात आहे आणि त्यांचे दोन बंदूकधारी गार्डसुद्धा गाडीचे दरवाजे उघडून जीव धोक्यात घालून बाहेर लटकलेले दिसत आहेत.

मात्र, या विषयावर परिवहन मंत्र्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. वाहतूक तज्ज्ञांनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील स्टंटबाजीचा हा प्रकार नियमांचे उल्लंघन करणारा आहे. मात्र, खुद्द परिवहन मंत्र्यांच्या अशा व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...