आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Vidhan Sabha Session, Amarinder Singh Government Today News Update | Aam Aadmi Party (AAP) MLA Sit In Inside Assembly

पंजाब विधानसभेत कृषी विधेयक सादर:केंद्राच्या विधेयकाविरोधात प्रस्ताव आणणारे पंजाब पहिले राज्य ठरले, मुख्यमंत्र्यांनी 3 विधेयके केली सादर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकाली दलाने काँग्रेसच्या मेनिफेस्टोची कॉपी जाळली

पंजाब विधानसभेत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज केंद्र सरकारच्या कृषी बिल आणि प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी (अमेंडमेंट) बिल विरोधात प्रस्ताव सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, तिन्ही कृषी विधेयक आणि प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी बिल शेतकरी आणि जमिन नसणाऱ्या मजुरांच्या विरोधात आहेत. केंद्राच्या बिलाविरोधात अमरिंदर सरकारने आपले तीन बिल सादर केले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने शेतीशी संबंधित 3 बिले सादर केले होते. पंजाब तसेच अनेक राज्यांनी याचा विरोध केला. शिरोमणी अकाली दलाने एनडीएशी संबंध तोडले होते. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 29 सप्टेंबर रोजी केंद्राची तिन्ही बिलाचे रुपांतर कायद्यात झाले होते.

अकाली दलाने काँग्रेसच्या मेनिफेस्टोची कॉपी जाळली
पंजाब विधानसभेच्या स्पेशल सेशनचा आज दुसरा दिवस आहे. आज विधानसभा सेशनमध्ये जाण्यापूर्वी शिरोमणी अकाली दलाच्या आमदारांनी 2017 निवडणुकीच्या काँग्रेसच्या मेनिफेस्टोची कॉपी जाळून विरोध केला. आमदार विक्रम मजीठिया यांनी म्हटले की, काँग्रेस मतं घेण्यासाठी आपल्या मेनिफेस्टोमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी लिहिले, मात्र आपले सरकार आल्यानंतर अमलात आणत नाही.

आपचे आमदार सदनातच धरणे करत बसले होते
यापूर्वी सोमवारी विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा झाला. अकाली नेता ट्रॅक्टर आणि आप आमदार काळी पगडी घालून पोहोचले. राज्य सरकारकडून केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधा आणल्या जाणाऱ्या बिलाची कॉपी मिळाली नसल्याने विरोधीपक्षाने गोंधळ घातला. याच्या विरोधात आप आमदार रात्रभर सदनातच धरणे करत बसले.
स्पीकर म्हणाले बिलमध्ये सर्व कायदेशीर बाजू पाहिल्या जात आहे. सरकारचा प्रयत्न आहे की, बिलमध्ये अशी कोणतीही कायदेशीर बाजू सुटू नये ज्यामुळे कोर्टात अडचणी येतील.

आप आमदार रात्रभर सदनातच धरणे करत बसले.
आप आमदार रात्रभर सदनातच धरणे करत बसले.
अकाली नेता ट्रॅक्टर आणि आप आमदार काळी पगडी घालून पोहोचले.
अकाली नेता ट्रॅक्टर आणि आप आमदार काळी पगडी घालून पोहोचले.
बातम्या आणखी आहेत...