आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाबमध्ये एकदा गँगवार सुरू होण्याचा धोका वाढला आहे मुसेवाला गँगस्टर दविंदर बंबीहा टोळीचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे या टोळीने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे.
या टोळीने मीत बाउंसर मनीमाजरा, लवी दियोरा आदींच्याही मृत्युचा सूड उगवण्याची धमकी दिली आहे. यामुळे पंजाबच्या रस्त्यांपासून तुरुंगापर्यंत गँगवॉर भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
खून करणाऱ्यांना सोडणार नाही
बंबीहा गँगने म्हटले आहे की, दुसऱ्या टोळीने विनाकारण आमच्या भावांचा खून केला. आम्ही निर्दोष व्यक्तीला काही म्हणणार नाही. पण, कुणी आमच्या शत्रूंची मदत केली तर तो आमचा शत्रू असेल यात शंका नाही. या पोस्टमध्ये गुडगावचा कुख्यात शूटर कौशल चौधरी, टिल्ली ताजपुरीया, दिल्ली एनसीआरचा गँगस्टर नीरज बवानाचेही नाव आहे.
लॉरेन्स गँगविरोधात एकजूट आहेत गँगस्टर
लॉरेन्स टोळीविरोधात पंजाबमधील अन्य टोळ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दविंदर बंबीहा यांच्यासह गँगस्टर नीरज बवाना भूप्पी राणा व गौंडर गँगनेही धमकी दिली आहे. कौशल चौधरी व टिल्लू ताजपुरियाही त्यांच्या पाठिशी आहेत.
लॉरेन्स टोळीच्या हस्तकाने घेतली जबाबदारी
मुसेवलाच्या हत्येचीज बाबदारी लॉरेन्स गँगच्या गँगस्टरने घेतली आहे. कॅनडातील गोल्डी बरार याने ही हत्या आपण घडवून आणल्याचे म्हटले आहे. त्यानंतर गँगस्टर लॉरेन्स याचा भाचा सचिन थापन बिश्नोई यानेहीही ही जबाबदारी घेतली. त्याने एका वृत्तवाहिनीला फोन करुन विक्की मिड्डूखेडाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुसेवालाची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट केले. आपण स्वतः मुसेवालाला गोळ्या घातल्याचा दावाही त्याने यावेळी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.