आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅक्सिन अपडेट:कोविशील्डच्या 1.1 कोटी डोसची खरेदी, एक डोस 210 रुपयांचा, देशातील 60 केंद्रांना पुरवठा सुरू

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या एिप्रलपर्यंत सीरमला आणखी 4.5 कोटी डोसची ऑर्डर देणार केंद्र सरकार

केंद्र सरकारने सोमवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (एसआयआय) ‘कोविशील्ड’ लसीच्या १.१ कोटी डोसची ऑर्डर दिली. देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होत आहे. एिप्रलपर्यंत सीरमला आणखी ४.५ कोटी डोसच्या पुरवठ्याची आर्डर दिली जाईल. उत्पादनाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरमनुसार ‘कोविशील्ड’ची भारतात किंमत २०० रुपये आहे. जीएसटी लावून ती २१० रुपये होईल.

सोमवारी सायंकाळपासून निर्धारित केंद्रांपर्यंत औषध पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीस ती ६० केंद्रांवर पाेहोचवली जाईल. तेथून पुढे वितरण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत सांगितले की, ‘पहिल्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.’ त्यानुसार, हेल्थ-फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी लसीबाबतच्या अफवांना आळा घालावा, असे ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

फायझर, झायकोव्ह-डी व स्पुटनिकची लस मिळण्याची आशा

  • पुण्याची कूलेक्स ही कार्गो कंपनी ‘कोविशील्ड’ देशभरात पोहोचवत आहे. उत्तरेत दिल्ली-कर्नाल, पूर्वेत कोलकाता-गुवाहाटीत मिनी हब आहेत. गुवाहाटी पूर्वोत्तर, तर चेन्नई - हैदराबाद हे दक्षिण पॉइंट्स आहेत.
  • फायझरने आपत्कालीन वापराची मंजुरी मागितली आहे. अहमदाबादची झायडस-कॅडिला ‘झायकोव्ह-डी’ आणि रशियाची ‘स्पुटनिक’ ही लसही चाचण्या घेऊन देशात लाँचिंगची तयारी करत आहे.

कोव्हॅसिन लसीची लवकरच खरेदी होण्याची शक्यता
केंद्र सरकारने अॅस्ट्राझेनेकाची व ऑक्सफर्डची ‘कोविशील्ड’ ही सीरम उत्पादित लस आणि स्वदेशी कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या कोरोना लसीच्या भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. ‘कोव्हॅक्सिन’ ही लस भारत बायोटेकने आयसीएमआरच्या मदतीने तयार केली आहे. ती विकत घेण्यासाठी आरोग्य मंत्रालय लवकरच आॅर्डर देऊ शकते.

दोन्ही लसी सर्वात किफायती, आणखी ४ नव्या लसी : मोदी
देशात मंजूर दोन्ही लसी जगात सर्वात किफायतशीर आहेत. अाणखी चार लसी तयार होण्याच्या प्रक्रियेत आहेत. नागरिकांना प्रभावी लस मिळण्यासाठी तज्ज्ञांनी काळजी घेतली आहे. देश कोरोनाविरोधातील निर्णायक टप्प्यात जात आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पुणे : कोरोना लसीची पहिली खेप सज्ज

पुणे | सीरममधून सोमवारी रात्री ‘कोविशील्ड’ लसीची पहिली गाडी पुण्याच्या नायडू सांसर्गिक रुग्णालयात पाठवली जाईल. निगडीच्या कूलेक्स कंपनीतून कोल्ड स्टोअरेजचे ६ कंटेनर सोमवारी संध्याकाळी सीरममध्ये दाखल झाले. सोमवारी रात्री त्यात लसीचे बॉक्स भरले जातील. मंगळवारी कंटेनर पुणे विमानतळाकडे रवाना होतील. तेथून ते देशभरात पोहोचवले जातील.

बातम्या आणखी आहेत...