आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मिरात गुंतवणूक:बाहेरील 185 लाेकांची काश्मिरात जमीन खरेदी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मिरात बाहेरील राज्यातील १८५ लोकांनी जमीन खरेदी केली आहे. २०२० मध्ये एका व्यक्तीने जमीन खरेदी केली होती. २०२१ मध्ये ५७ आणि २०२२ मध्ये १२७ जणांनी जमीन खरेदी केली. केंद्राने राज्यसभेत ही माहिती दिली.

केंद्र सरकारने सांगितले की, जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत बहुराष्ट्रीय कंपन्यांसह १,५५९ भारतीय कंपन्यांनी जम्मू-काश्मिरात गुंतवणूक केली अाहे. २०२० मध्ये ३१०, २०२१ मध्ये १७५ आणि २०२२-२३ मध्ये १०७४ कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.