आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांगली मागणी व नव्या ऑर्डर मिळत असल्याने देशातील उत्पादन क्षेत्रातील उत्पादनाला वेग आला आहे. हे उत्पादन वाढून १३ महिन्यांच्या उच्च पातळीवर पोहोचले आहे. ही माहिती एसअँडपी ग्लोबल पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या (पीएमआय) अहवालात दिली आहे. यानुसार, डिसेंबरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय वाढून ५७.८ झाला.
तो नोव्हेंबरमध्ये ५५.७ होता. पीएमआयच्या भाषेत ५० पेक्षा अधिक आकडा म्हणजे विस्तार आहे, तर ५० पेक्षा खालचा आकडा घटता क्रम दर्शवतो.
देशाच्या एकूण जीडीपीत उत्पादन क्षेत्राची भागीदारी १६% आणि रोजगाराच्या बाबतीत ३८% आहे. यावरून उत्पादन क्षेत्राचे महत्त्व समजून घेता येईल. एसअँडपी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या सहयोगी संचालक पोलियाना डी. लीमा म्हणाल्या, २०२२ ची सुरुवात खूप चांगली होती. तेव्हापासून उत्पादन क्षेत्राची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे. मागणी वाढल्याने डिसेंबरमध्ये विक्रीत वाढीला चालना मिळाली. काही बाबतीत उत्पादनांत वैविध्य व अनुकूल आर्थिक स्थितीने विक्रीला मदत केली आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये भारतीय वस्तूूंच्या आंतरराष्ट्रीय मागणीत काही मर्यादेपर्यंत सुधारणा झाली आहे. विदेशांतील ऑर्डर ५ महिन्यांत सर्वात मंद गतीने वाढत आहेत.
उत्पादन क्षेत्राची भागीदारी
जीडीपी : १६%
रोजगार : ३८%
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.