आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Puri Jagannath Rath Yatra 2020 Update | Supreme Court Stayed Rath Yatra At Puri Jagannath Temple

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगन्नाथ रथयात्रा रद्द:'कोरोना काळात यात्रेला परवानगी दिल्यास भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाहीत'- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक एनजीओने रथयात्रा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती

सुप्रीम कोर्टाने ओडिशाच्या पुरीमध्ये 23 जूनपासून सुरू होणाऱ्या भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेवर गुरुवारी बंदी लावली आहे. चीफ जस्टिस एसए बोबडे म्हणाले की, 'कोरोना काळात यात्रेला परवानगी दिल्यास भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाहीत.'

सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटले की, कोरोना महामारी सर्वत्र पसरली असल्यामुळे यात्रेला परवानगी दिली जाऊ शकत नाही. नागरिकांची सुरक्षा पाहता, यावर्षीची यात्रा होऊ शकत नाही. चीफ जस्टिस यांच्या बेंचने ओडिशा सरकारला सांगितले की, यावर्षी यात्रेसंबंधी कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ नये.

एनजीओने दाखल केली याचिका

रथयात्रेवर अनेक दिवसांपासून प्रश्नचिन्ह होते. यादरम्यान, भुवनेश्वरमधील एनजीओ ओडिशा विकास परिषदने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेत म्हटले की, लोकांच्या सुरक्षेखातर दिवाळीला फटाके फोडण्यावर कोर्ट बंदी घालू शकतो, तर रथयात्रेवर का बंदी घालता येणार नाही ?

भक्तांशिवाय यात्रा काढण्याचा निर्णय 

मंदिर समितीने रथयात्रेला भक्तांशिवाय काढण्याचा निर्णय घेतला. रथ बनवण्याचे कामही वेगाने होत आहे. मंदिर समितीने रथ ओढण्यासाठी अनेक पर्याय ठेवले आहेत. पोलिस कर्मचारी, मशीन किंवा हत्तींच्या साहाय्याने रथाला गुंडिचा मंदिरपर्यंत नेण्याचा विचार होत आहे.

बातम्या आणखी आहेत...