आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Puri Temple Will Be Decorated Till The Next Rath Yatra! For The First Time In 100 Years, The Entire Boundary Wall Of The Temple Appeared

ग्राउंड रिपोर्ट:पुढील रथयात्रेपर्यंत नटलेले असेल पुरी मंदिर! 100 वर्षांत पहिल्यांदा मंदिराची संपूर्ण सीमा भिंत दिसू लागली

पुरी | सुजित ठाकूर19 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

ओडिशातील जगन्नाथपुरीत ९ दिवसीय रथयात्रा एक जुलैपासून सुरू होत आहे. रथ बनवण्याचे कामही जोरात सुरू आहे. या वेळी भगवान जगन्नाथ मंदिर एक किमी दूरवरील पार्किंगपासून दिसत आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवली. आजुबाजूचे २० मठही हटवले गेल्याने मंदिर दुरूनच दिसत आहे. या बदलाचे कारण म्हणजे श्री जगन्नाथ मंदिर परिसर कॉरिडॉरचा कायापालट आहे. राज्य सरकारने मार्च २०२३ पर्यंत मंदिर परिसर सजवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर भाविक पार्किंगपासूनच्या रस्त्याने थेट मंदिराच्या उत्तर द्वारात पोहोचतील. मुख्य रस्त्यावर वाहतूक नसेल.

 • कोरोनापूर्वी रथयात्रेत ७-१० लाख भाविक येत होते. या वेळी १२-१५ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. विकासकामे पूर्ण झाल्यावर २५ लाख भाविकांची क्षमता होईल.
 • १०० वर्षांत पहिल्यांदा मंदिराची सीमा भिंत (मेघानंद प्राचीर) पूर्णपणे दिसणार आहे.
 • भाविकांसाठी ३ धर्मशाळा बनतील. सध्याचा पार्किंग परिसर चार मजली होईल. माहिती देण्यासाठी नवे माहिती केंद्रही उभारले जाईल.
 • मंदिर प्रशासनाने एकूण ३२०० कोटी रुपयांची योजना आखली असून ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल.
 • प्रकल्प अभियंता देवीप्रसन्न घोष यांच्या मते, प्रारंभी ३३१ कोटी केवळ १२ एकरांवरील बांधकाम आणि पुनरउभारणीसाठी आहेत. १२ कोटी खर्च झाले आहेत.
 • विकासकामांची जबाबदारी सांभाळणाऱ्या ओडिशा ब्रिज कन्स्ट्रक्शन कंपनीचे एमडी जे.के. दास म्हणाले की, पूर्ण काम टाटा प्रोजेक्ट करत आहे.
 • विकासकामे पूर्णत्वानंतर पुरी वारशाचे आंतरराष्ट्रीय स्थळ बनेल. मंदिरासह पूर्ण नगराचाही कायापालट होईल.

पुरीचा जगन्नाथ मंदिर परिसर १९ एकरांत पसरलेला आहे. पैकी ७ एकरांत मंदिर आहे. १२ एकरांत विकासकामे होणार आहेत. संपूर्ण परिसर (७ एकर सोडून) चौकोनी आकारात विकसित होईल. याचे सात थर असतील.

पहिला थर : हा बफर झोन असेल. मंदिर भवनापासून ७ मीटर परिघात कोणीच प्रवेश करू शकणार नाही. पुजारीही नाही.

दुसरा थर : आतील परिक्रमा पथ १० मीटर रुंद. रथयात्रेदरम्यान मंदिरातील मूर्ती आणणारे मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित लोकच ये-जा करू शकतील.​​​​​​​

तिसरा थर : लँडस्केप १४ मीटर रुंद. इथे बाग, फुटपाथ व रॅम्प असेल. सामान्य भक्त बसून मंदिर न्याहाळू शकतील.​​​​​​​
चौथा थर : बाह्य परिक्रमा पथ ८ मीटर रुंद असेल. फक्त परिक्रमा करू शकतील. परिक्रमेसाठी बॅटरीवरील रिक्षांचा वापर करता येईल.

पाचवा थर : १० मीटर रुंद. स्वच्छतागृह, क्लॉक रूम, रेस्टरूम आदी सुविधा.

सहावा थर : सर्व्हिस लेन ४.५ मीटर रुंद. यात फक्त रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने ये-जा करू शकतील.

सातवा थर : आउटर एरिया रोड असेल. २० मीटर रुंद या रस्त्यावरून भक्त ऑटो, बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षाने ये-जा करू शकतील.

कायापालटामुळे खुली जागा ५ एकराने वाढून २५ पेक्षा अधिक एकर होईल. रस्ता मेघानंद प्राचीरपासून ५५ मीटर दूर होईल. सध्या तो मंदिरला लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...