आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Purnagiri Janshatabdi Express Latest News Update Train Runs In Opposite Direction (Reverse) For 35 Kilometres In Uttarakhand Khatima

35 KM उलट दिशेने धावली ट्रेन:जनावरांना वाचवण्यासाठी ड्रायव्हरने अचानक लावला ब्रेक, कंट्रोलिंग सिस्टीम फेल होऊन उलट दिशेने धावली ट्रेन

डेहराडूनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे विभाग कंफ्यूज, रिव्हर्स कशी चालली ट्रेन ?

विचार करा की, तुम्ही एका ट्रेनमध्ये बसला आहात. ती ट्रेन वेगाने आपल्या ठरलेल्या दिशेने जात आहे. पण अचानक ट्रेन थांबते आणि उलट दिशेने धावायला लागते. अशा परिस्थितीत तुमची अवस्था काय असेल ? अशीच एक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. यात एक मोठा अपघात थोडक्यात टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीवरुन उत्तराखंडच्या टनकपुरकडे बुधवारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस निघाली होती. टनकपुरपासून काही अंतरावर खटीमाजवळ अचानक ट्रेन उलट दिशेने धावायला लागली. उलट दिशेनेही ट्रेन खूप वेगाने धावू लागली. अचानक झालेल्या या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यांना काहीच कळेना की, नेमके झाले काय.

अखेर 35 किलोमीटरपर्यंत रिव्हर्स येऊन ट्रेन खटीमा यार्डजवळ थांबली. या घटनेत कोणत्याच प्रवाशाला इजा झाली नाही. ट्रेन उलट्या दिशेने धावल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. ट्रेन रिव्हर्स येताना अनेकांनी ट्रेनचा व्हिडिओदेखील काढला. ट्रेन थांबल्यानंतर रेल्वे विभागाने सर्व प्रवाशांना बसद्वारे टनकपुरला पाठवले.

रेल्वे विभाग कंफ्यूज, रिव्हर्स कशी चालली ट्रेन ?

रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हरने रेल्वे ट्रॅकवर आलेल्या जनावरांना वाचवण्यासासाठी अचानक ब्रेक लावला, यात ब्रेकमध्ये तांत्रिक खराबी झाली आणि ट्रेन अचानक उलट दिशेने धावू लागली. सध्या रेल्वे विभाग याच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहे.

लोको पायलट आणि गार्ड सस्पेंड

या घटनेनंतर रेल्वेने लोको पायलट आणि ट्रेन गार्डला निलंबित केले आहे. नॉर्थ इस्टर्न रेल्वेने सोशल मीडियावर याची माहिती दिली. त्यांनी लिहीले- "17.03.2021 ला खटीमा-टनकपुर सेक्शनदरम्यान जनावरांमुळे मोठा अपघात थोडक्यात टळला. ट्रेन खटीमा यार्डजवळ येऊन थांबली. सर्व प्रवाशी सुरक्षित असून, लोको पायलट आणि गार्डला निलंबित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...