आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pushkar Singh Dhami 12th CM Of Uttarakhand, Also Sworn In Of Eight Ministers, Narendra Modi, Amit Shah And Yogi Adityanath Were Present At The Ceremony|Marathi News

शपथविधी:पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे 12 वे सीएम, आठ मंत्र्यांचाही शपथविधी, समारंभाला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ होते उपस्थित

डेहराडून3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुष्करसिंह धामी यांनी दुसऱ्यांदा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) गुरमीतसिंग यांनी बुधवारी धामी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. धामी हे राज्याचे १२ वे मुख्यमंत्री आहेत.

शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. धामी यांच्या मंत्रिमंडळात आठ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात धनसिंह रावत, गणेश जोशी, रेखा आर्य, सुबोध उनियाल, सौरभ बहुगुणा, प्रेमचंद अग्रवाल, चंदन राम दास आणि सतपाल महाराज यांचा समावेश आहे. पुष्करसिंह धामी हे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निकटवर्तीय आहेत.

बातम्या आणखी आहेत...