आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pushkar Singh Dhami | Uttarakhand CM Pushkar Singh Dhami Oath Ceremony News Updates

पुष्कर सिंह धामी बनले उत्तराखंचे 12वे मुख्यमंत्री:आज घेतली शपथ, कार्यक्रमात मोदी-शाह आणि योगींची उपस्थिती, सलग दुसरा कार्यकाळ मिळणारे धामी पहिलेच

डेहराडून3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा पुष्कर सिंह धामी यांची निवड केली आहे. आज पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लेफ्टिनेंट जनरल (सेवानिवृत्त) गुरमीत सिंग यांनी धामी यांनी शपथ दिली. शपथग्रहन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील उपस्थित होते. डेहराडूनमधील परेड ग्रॉऊंडमध्ये झालेल्या शपथ समारंभात कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. पुष्कर सिंह धामी हे आता उत्तराखंडचे 12 वे मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री म्हणून सलग दुसरा कार्यकाळ मिळणारेही धामी उत्तराखंडचे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. धामी यांच्यासोबतच आठ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यात धनसिंह रावत, गणेश जोशी, रेखा आर्य, सुबोध उनियाल, सौरभ बहुगुणा, प्रेमचंद अग्रवाल, चंदन राम दास आणि सतपाल महाराज यांचा समावेश आहे.

पुष्कर सिंह धामी यांची पक्षावर मजबूत पकड आहे. ते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या जवळचे आहेत. याशिवाय धामी हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या जवळचे मानले जातात.

2012 मध्ये प्रथम बनले आमदार-

पुष्कर सिंह धामी 2012 मध्ये पहिल्यांदा खटिमा मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या देवेंद्र चंद यांचा जवळपास 5 हजार मतांनी पराभव केला होता. 2017 च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा या मतदार संघातून निवडून आले. त्यात त्यांनी काँग्रेसच्या भूवनचंद्र कापडी यांचा 3 हजारांहून कमी मतांनी पराभव केला. यानंतर ते उत्तराखंडचे 11 वे मुख्यमंत्री झाले. यावेळी कापडी यांनी त्यांचा 6 हजार मतांनी पराभव केला.

पराभूत झाले, पण मुख्यमंत्री पद मिळवले -
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या चेहऱ्यावर पक्ष सत्तेपर्यंत पोहोचला, पण धामी स्वतः आपली जागा वाचवू शकले नाही. धामी यांचा विधानसभा निवडणुकीत खटिमा मतदार संघातून पराभव झाला होता. धामी यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद्र कापरी यांनी 6 हजार 579 मतांनी केला. धामी यांचा पराभव झाल्याने भाजपचे अन्य नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरल्याने मोठा गुंता निर्माण झाला होता. पण, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांची एकमताने विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आणि मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला. उत्तराखंडमध्ये पराभूत झालेल्या एखाद्या व्यक्तीकडे प्रथमच मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.

भाजपने उत्तराखंडमध्ये 70 पैकी 47 जागा जिंकल्या आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये भाजपने उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी पुष्करसिंह धामी यांची निवड केली होती. निवडणुकीला काही महिने राहिले असतानाच धामी राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्यापूर्वी तीरथसिंह रावत आणि त्रिवेंद्रसिंह रावत मुख्यमंत्री होते.

धामी यांचे एमपीच्या सागरमध्ये झाले शिक्षण -
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा जन्म 16 सप्टेंबर 1975 रोजी पिथौरागडच्या तुंडी गावात रोजी झाला होता. धामी यांचे मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्याशी गहिरे नाते आहे. धामी यांचे वडील लष्करात होते. त्यांची सागरमध्ये नियुक्ती होती. 1993-94 दरम्यान पुष्कर सिंह यांचे सागर स्थित केंद्रीय महाविद्यालयात शिक्षण झाले. विद्यार्थी दशेत ते राजकारणातही सक्रिय होते. केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेताना त्यांचा आरएसएसशी संबंध आला. संघाशी संबंध असल्यामुळे त्यांचे माजी मंत्री स्व. हरनाम सिंह राठोड यांच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. माजी आमदार राठोड यांच्यासोबत ते भोपाळमधील पक्षाच्या अनेक कार्यक्रमांत सहभागी झाले होते.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ
बातम्या आणखी आहेत...