आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री:23 मार्च रोजी घेणार शपथ, पराभवानंतरही भाजप हायकमांडने सोपविली जबाबदारी, राजनाथ म्हणाले होते- फ्लावर भी हैं और फायर भी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा पुष्कर सिंह धामी यांची निवड केली आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. ते येत्या 23 तारखेला सलग दुसऱ्यांदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपणीयतेची शपथ घेतील. या घोषणेमुळे या प्रकरणी गत 11 दिवसांपासून सुरू असलेला राजकीय सस्पेंस संपुष्टात आला आहे.

धामी यांचा विधानसभा निवडणुकीत खटिमा मतदार संघातून पराभव झाला होता. यामुळे भाजपचे अन्य नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरल्याने मोठा गुंता निर्माण झाला होता. पण, अखेर धामी यांच्या निवडीने हा गुंता सुटला आहे. निवडणूक प्रचारात राजनाथ सिंहांनी धामी फ्लावर व फायर हे दोन्ही असल्याचे म्हटले होते. उत्तराखंडमध्ये पराभूत झालेल्या एखाद्या व्यक्तीकडे प्रथमच मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री म्हणून सलग दुसरा कार्यकाळ मिळणारेही धामी उत्तराखंडचे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.

पुष्कर सिंह धामी: कोश्यारी व राजनाथांचे विश्वासू, उत्तराखंडचे पहिले भाजयुमो अध्यक्ष

16 सप्टेबर 1975 रोजी पिथौरागडच्या तुंडी गावात जन्मलेल्या पुष्कर सिंह धामी यांची पक्षावर मजबूत पकड आहे. ते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विश्वासू आहेत. याशिवाय ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. उत्तराखंडच्या निर्मितीवेळी ते भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष होते.

2012 मध्ये प्रथम बनले आमदार

पुष्कर सिंह धामी 2012 मध्ये पहिल्यांदा खटिमा मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या देवेंद्र चंद यांचा जवळपास 5 हजार मतांनी पराभव केला होता. 2017 च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा या मतदार संघातून निवडून आले. त्यात त्यांनी काँग्रेसच्या भूवनचंद्र कापडी यांचा 3 हजारांहून कमी मतांनी पराभव केला. ते उत्तराखंडचे 11 वे मुख्यमंत्री झालेत. यावेळी कापडी यांनी त्यांचा 6 हजार मतांनी पराभव केला.

राज्याच्या सत्तेत चढ-उतार

9 नोव्हेंबर 2000 रोजी देशाचे 27 वे राज्य म्हणून अस्तित्वात आलेल्या उत्तराखंडला आतापर्यंत 12 मुख्यमंत्री लाभले. 2000 मध्ये भाजपला पहिले अंतरिम सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. त्यावेळी नित्यानंद स्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यांना एका वर्षाच्या आतच ऑक्टोबर 2001 रोजी राजीनामा द्यावा लागला. त्यांची जागा भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली. कोश्यारींना जवळपास 4 महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला. कारण, 2002 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात भाजपचा दारुण पराभव झाला.

काँग्रेसचे तिवारी झाले मुख्यमंत्री

काँग्रेसची सत्ता आल्यानंतर नारायण दत्त तिवारी राज्याचे तिसरे मुख्यमंत्री झाले. तिवारी यांनाच आतापर्यंत उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे. 2007 च्या निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेची संधी मिळाली. भाजपने तत्कालीन खासदार भूवन चंद्र खांडुरी यांना मुख्यमंत्री केले. पण, सव्वादोन वर्षांनंतर जून 2009 मध्ये त्यांच्या जागी रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली. निशंक यांनाही जवळपास सव्वादोन वर्षे या पदावर राहण्याची संधी मिळाली. त्यानंतर सप्टेबर 2011 मध्ये भाजपने पुन्हा खांडुरी यांच्याकडे सूत्रे सोपवली.

काँग्रेसचे सत्तेत पुनरागमन

2012 च्या तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सत्तेत पुनरागमन झाले. काँग्रेसने यावेळीही आमदाराऐवजी खासदार विजय बहूगुणा यांना मुख्यमंत्री केले. बहूगुणा मार्च 2012 ते जानेवारी 2014 पर्यंत खूर्चीवर राहिले. काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे त्यांना पद सोडावे लागले. त्यानंतर फेब्रुवारी 2014 मध्ये हरिश रावत मुख्यमंत्री झाले.

काँग्रेसचा पराभव

2017 च्या चौथ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता जाऊन पुन्हा भाजपला चांगले दिवस आले. यावेळी भाजपने आमदार त्रिवेंद्र सिंह रावत यांना मार्च 2017 रोजी मुख्यमंत्र्याच्या खूर्चीवर बसवले. 4 वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी काही दिवस अगोदरच 9 मार्च 2021 रोजी त्रिवेंद्र यांना एका अनपेक्षित घटनाक्रमानंतर मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. 10 मार्चला तीरथ सिंह रावत राज्याचे 10 मुख्यमंत्री झाले. पण, अवघ्या 114 दिवसांतच त्यांना हे पद सोडावे लागले. त्यानंतर 11 वे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्याकडे सत्ता आली.

धामी यांचे एमपीच्या सागरमध्ये झाले शिक्षण

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्याशी गहिरे नाते आहे. केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेताना त्यांचा आरएसएसशी संबंध आला. या काळात ते माजी मंत्री स्व. हरनाम सिंह राठोड यांच्या कुटूंबियांच्याही संपर्कात आले. धामी यांचे वडील लष्करात होते. त्यांची सागरमध्ये नियुक्ती होती. 1993-94 दरम्यान पुष्कर सिंह यांचे सागर स्थित केंद्रीय महाविद्यालयात शिक्षण झाले. विद्यार्थी दशेत ते राजकारणातही सक्रिय होते. संघाशी संबंध असल्यामुळे त्यांचे माजी मंत्री स्व. हरनाम सिंह राठोड यांच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. माजी आमदार राठोड यांच्यासोबत ते भोपाळमधील पक्षाच्या अनेक कार्यक्रमांत सहभागी झाले होते.

उत्तराखंड विधानसभा सचिवालयाने शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.
उत्तराखंड विधानसभा सचिवालयाने शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.

आमदारांनी घेतली शपथ

उत्तराखंडच्या पाचव्या विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांना प्रोटेम स्पीकर बंसीधर भगत यांनी सोमवारी शपथ दिली. अनुपमा रावत यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. काँग्रेस आमदार तिलक राज बेहड यांना काही कारणांमुळे या शपथविधी सोहळ्याला हजर राहता आले नाही. आमदार ऋतु खांडुरी व महाराज यांनी संस्कृत व किशोर उपाध्याय यांनी गढवालीत शपथ घेतली. तत्पूर्वी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग (सेवानिवृत्त) यांनी बंसीधर भगत यांना प्रोटेम स्पीकर पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर आमदारांनी विधानसभेच्या सभापतींची निवड केली.

बातम्या आणखी आहेत...