आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pushpa Sarees India | Marathi News | Amazing Sarees Of 'Pushpa' And 'Srivalli' Came In The Market, Women Were Amazed To See Sarees!

पुष्पा साडी बाजारात:'पुष्पा' आणि 'श्रीवल्ली'च्या अप्रतिम साड्या बाजारात दाखल, साडी बघताच महिला झाल्या अवाक!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य चित्रपट 'पुष्पा: द राइझ'ला देशभरात प्रेषकांनी पसंती दिली आहे. पुष्पाचे दमदार डॉयलॉग्स असो की, मनाला भावनाने चित्रपटातील गाणे असो, या चित्रपटाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. पुष्पातील श्रीवल्ली आणि सामी-सामी या गाण्यांवर तर सर्वसामान्यांबरोबर अनेक दिग्गजांनी नृत्य करत इंस्टाग्राम रिल्स शेअर केला. दरम्यान पुष्पा या चित्रपटातील कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या दोघांच्या छायाचित्राची साडी बाजारात आली आहे. ही साडी पाहून सर्वांनी अक्षरश: तोंडाला हात लावले आहे.

श्रीवल्ली आणि पुष्पाची साडी देशभर लोकप्रिय
'पुष्पा'ची भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुन सारखी हुबेहूब डॉयलॉग्सची अनेक जणांनी कॉपी केली. गाण्यांपासून ते डॉयलॉग्सपर्यंत सर्वच बाबतीत हा चित्रपट हिट ठरला आहे. आता अनेक फॅशन डिझायनर्सही चित्रपटाच्या पोस्टर्ससोबत साड्या छापून चित्रपटाची लोकप्रियता दाखवण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्विटरवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चित्रपटाच्या पोस्टरसह छापलेल्या साड्या गुजरातमधील सुरतमध्ये दाखवल्या आहेत. चरणजीत क्रिएशन्स या स्थानिक दुकानाने बनवलेली अनोखी साडी शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

'पुष्पा' पोस्टर वापरून साडी बनवली
पुष्पा पोस्टर वापरून साडी बनवण्याची कल्पना मालक चरणपाल सिंग यांनी मांडली होती, ज्यांनी सोशल मीडियावर छापील साड्यांचे अनेक नमुने शेअर केले होते जे आता व्हायरल होत आहेत. पुष्पाची पोस्टरची साडी व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच, अनेक ग्राहकांनी दुकानात गर्दी केली आणि मालकाला देशभरातील कापड व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आली. राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडसह प्रमुख राज्यांतील लोक आता 'पुष्पा' साड्या ऑर्डर करत आहेत.

जोपर्यंत या चित्रपटाचा ट्रेंड चालू आहे, तोपर्यंत काहीतरी नवीन आणि विचित्र पाहायला मिळत राहील. जेव्हा महिलांनी ही साडी पाहिली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, त्यामुळेच आता या साडीला महिलांमध्ये मोठी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...