आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Queen Elizabeth II Death | The National Flag On Government Buildings Will Be Lowered To Half mast

ब्रिटनच्या महाराणीला श्रद्धांजली:भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवणार

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर आज भारतात एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात येतील. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मृतीनिमित्त आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतात एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटनवर त्यांनी तब्बल 70 वर्ष राज्य केले.

आज भारतात महाराणी एलिझाबेथ यांच्या स्मरणार्थ एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. या दिवशी सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्या उंचीवर फडकण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. 1952 साली त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे 70 वर्षांपर्यंत त्या राजसत्तेवर होत्या.

8 सप्टेंबरला निधन

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर अनेक देशाच्या राजकीय मंडळींनी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

7 दशकं होत्या महाराणी

एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या महाराणी नाहीत. ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा आणि सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या.

बातम्या आणखी आहेत...