आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणींच्या जयपूर दौऱ्यात वाघाच्या शिकारीमुळे झाला होता वाद:दरबार लावण्याच्या वृत्तावर नेहरूंनीही व्यक्त केली होती नाराजी...

जयपूर|लेखक: सौरभ खंडेलवालएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ-II यांचे निधन झाले आहे. एलिझाबेथ तीन वेळा भारत दौऱ्यावर आल्या होत्या. पहिल्या दौऱ्यादरम्यान त्या जयपूर आणि उदयपूरला गेल्या होत्या. हा दौरा खूप वादग्रस्तही राहिला. तो आठवण्यासाठी आम्ही त्यांच्या राजस्थानशी निगडीत इतिहासाचा शोध घेतला. उन्हाळ्याचे दिवस होते. घोषणा झाली की, महाराणी एलिझाबेथ-II भारत दौऱ्यावर येणार आहेत. जयपूरच्या राजघराण्याचे प्रमुख सावाई मानसिंह ब्रिटनच्या शाही विंडसर पॅलेसमध्ये एका पोलो मॅचदरम्यान महाराणींना भेटले. मानसिंह म्हणाले की, भारत दौऱ्यादरम्यान जयपूरची तुमचे आदरातिथ्य करण्याची इच्छा आहे. महाराणींनी तत्काळ याला होकार दिला. तत्काळ माहाराणींचे पर्सनल सेक्रेटरी मायकल अॅडन आणि लंडनमधील भारताचे उच्चायुक्त विजय लक्ष्मी पंडित यांच्याशी संपर्क करून एलिझाबेथ यांच्या भारत दौऱ्यादरम्यान जयपूरचे नावही जोडण्यात आले. महाराणींच्या वतीने सांगण्यात आले की हा दौरा होईल तितका अनौपचारिकच ठेवला जावा.

जयपूर दौऱ्यादरम्यान रामबाग पॅलेसमध्ये जयपूरच्या माजी राजघराण्याचे प्रमुख सवाई मानसिंह आणि गायत्री देवींच्यासोबत महाराणी एलिझाबेथ आणि ड्युक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप.
जयपूर दौऱ्यादरम्यान रामबाग पॅलेसमध्ये जयपूरच्या माजी राजघराण्याचे प्रमुख सवाई मानसिंह आणि गायत्री देवींच्यासोबत महाराणी एलिझाबेथ आणि ड्युक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप.

निश्चित झाले की महाराणी एलिझाबेथ 23 जानेवारी 1961 रोजी जयपूरला येणार. महाराणींचे शाही बकिंघम पॅलेस, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्रालय आणि दिल्लीचे प्रोटोकॉल डिव्हिजन सर्व तयारी योग्य पद्धतीने व्हाव्या या दृष्टीने कामाला लागले. महाराणींच्या दौऱ्यादरम्यान काहीही कसूर राहू नये यासाठी प्रत्येक प्लॅनसोबत प्लॅन बीही तयार करण्यात आला. मात्र काही दिवसांनंतर एक अशी घटना घडली की, भारतापासून ते ब्रिटनपर्यंत एकच गोंधळ उडाला. जयपूरच्या माजी महाराणी गायत्री देवींनी त्यांची आत्मकथा 'अ प्रिन्सेस रिमेम्बर्स-मेमोअर्स ऑफ द महारानी ऑफ जयपूर'मध्ये लिहिले आहे की, महाराणी एलिझाबेथ या जयपूर दौऱ्यादरम्यान वाघाच्या शिकारीसाठी सवाई माधोपूरमधील जयपूरच्या राजघराण्याच्या शिकारगाहमध्येही जातील अशी घोषणा झाली. त्यानंतर ब्रिटनमध्ये यावरून महाराणींविरोधात निदर्शने सरू झाली. भारतातही या बातम्या पसरू लागल्या. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू याविषयी चिंतीत झाले. त्यांनी सवाई मानसिंह यांना पत्र लिहून कळवले की, या शिकारीदरम्यान वाघाला लालुच दाखवण्यासाठी कोणत्याही जिवंत जनावराचा वापर केला जाऊ नये याची काळजी घ्या.

जयपूरमध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी भांकरोटा गावा नळ योजनेचे उद्घाटनही केले होते. हे गाव ता जयपूर शहरातच येते.
जयपूरमध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी भांकरोटा गावा नळ योजनेचे उद्घाटनही केले होते. हे गाव ता जयपूर शहरातच येते.

हा वाद शमला नव्हता की, लगेच पुन्हा आणखीन एक नवीन वाद निर्माण झाला. महाराणींच्या सन्मानार्थ होणाऱ्या रिसेप्शनच्या निमंत्रणावरून असे बोलले जाऊ लागले की, जयपूरच्या माजी राजघराण्याचे प्रमुख दरबार आयोजित करणार आहेत. गायत्री देवी त्यांच्या पुस्तकात लिहितात की, ही बातमी भारतीयांच्या भावना दुखावणारी होती. कारण भारत स्वतंत्र झाला होता. पुन्हा एकदा पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी पत्र लिहून याविषयी मानसिंहांना विचारणा केली. मानसिंहांनी उत्तर दिले - मी यामुळे खुप दुःखी आहे की पंतप्रधान मला खूप बेजबाबदार समजत आहेत. रिसेप्शनसाठी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेतील शब्दांवरून स्पष्ट होत आहे की महाराणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्युक ऑफ एडिनबर्ग प्रिंस फिलिप यांच्या सन्मानार्थ दरबार लावण्याची कोणतीही योजना नाही.

हा फोटो रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या वेबसाईटवरून घेतला आहे. जयपूर सिटी पॅलेसजवळ महाराणी एलिझाबेथ हत्तीवर बसल्या आणि सिटी पॅलेसमध्ये गेल्या.
हा फोटो रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या वेबसाईटवरून घेतला आहे. जयपूर सिटी पॅलेसजवळ महाराणी एलिझाबेथ हत्तीवर बसल्या आणि सिटी पॅलेसमध्ये गेल्या.
सिटी पॅलेसमध्ये एलिफंट राईडदरम्यान महाराणी एलिझाबेथ, त्यांच्यासोबत सवाई मानसिंहही बसलेले होते.
सिटी पॅलेसमध्ये एलिफंट राईडदरम्यान महाराणी एलिझाबेथ, त्यांच्यासोबत सवाई मानसिंहही बसलेले होते.

जयपूरमध्ये शाही स्वागत, हत्तीवर बसून फिरल्या महाराणी
महाराणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती 23 जानेवारी 1961 रोजी जयपूरला आले. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गायत्री देवी त्यांच्या पुस्तकात लिहितात, महाराणी एलिझाबेथ यांच्या स्वागतासाठी जयपूरचे लोक रस्त्यावर आले. सिटी पॅलेसच्या गेटजवळ महाराणी हत्तीवर स्वार झाल्या. तेव्हा सिटी पॅलेस खूप चमकत होता. हत्ती, घोडे, उंट, बैलगाड्यांचा पूर्ण ताफा होता. हत्ती सोने-चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले होते. सिटी पॅलेसच्या प्रेक्षक गॅलरीत मी एलिझाबेथ यांचे स्वागत केले. मी सिटी पॅलेसमध्ये अनेक भव्य समारंभ बघितले होते, पण हा समारंभ सर्वात अद्भूत होता.

हा फोटो रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या वेबसाईटवरून घेतला आहे. गायत्री देवींनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की यादरम्यान हत्तीही सोने-चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले होते.
हा फोटो रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या वेबसाईटवरून घेतला आहे. गायत्री देवींनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की यादरम्यान हत्तीही सोने-चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले होते.

शिकारीवर जाण्यासाठी सरकारने दिली लक्झरी ट्राम
गायत्री देवी लिहितात, आम्ही आमच्या आवडीच्या शिकारगाहमध्ये एका लक्झरी ट्राममधून गेलो. ही ट्राम आम्हाला सरकारने दिली होती. आम्ही आमच्यासोबत कोणतेही एडीसी नव्हते नेले. सवाई मानसिंह यांच्या चार मुलांशिवाय शूटींग इक्विप्मेंट इन्चार्ज केशरी सिंह आमच्या सोबत होते. तेव्हा ट्रामच्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक टेलिफोन होता.

रणथंबोरच्या जंगल सफारीदरम्यान एलिझाबेथ आणि त्यांचा ताफा.
रणथंबोरच्या जंगल सफारीदरम्यान एलिझाबेथ आणि त्यांचा ताफा.

महाराणींच्या पतीने पहिल्याच दिवशी केली वाघाची शिकार
गायत्री देवी लिहितात, ड्युक ऑफ एडिनबर्ग प्रिंस फिलिप यांनी पहिल्या दिवशी एका मोठ्या वाघाची शिकार केली. यानंतर आम्ही शानदार लंच केला आणि पुन्हा जंगली जीवन बघायला बाहेर पडलो. पुढच्या दिवशी ड्युक ऑफ एडिनबर्ग यांचे खजिनदार सर क्रिस्टोफर बोनहम कार्टर यांनी आणखी एका वाघाची शिकार केली. यानंतर आम्ही रणथंबोरचा अभेद्य किल्ला बघायला गेलो आणि डोंगराच्या टेकडीवर डिनर केला.

वाघाच्या शिकारीनंतर महाराणी एलिझाबेथ आणि गायत्री देवींसह ब्रिटनहून आलेले प्रतिनिधीमंडळ.
वाघाच्या शिकारीनंतर महाराणी एलिझाबेथ आणि गायत्री देवींसह ब्रिटनहून आलेले प्रतिनिधीमंडळ.
रणथंबोरच्या जंगलात शिकारीदरम्यान महाराणी एलिझाबेथ. त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांनी एका वाघाची शिकार यावेळी केली.
रणथंबोरच्या जंगलात शिकारीदरम्यान महाराणी एलिझाबेथ. त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांनी एका वाघाची शिकार यावेळी केली.

महाराणी व्हिक्टोरियांच्या पडद्याचा कोट बनवून घातला
गायत्री देवी त्यांच्या पुस्तकात लिहितात, महाराणी एलिझाबेथ हे ऐकून आश्चर्यचकीत झाल्या की शूटींग इक्विपमेंट इंचार्ज केशरी सिंह यांनी जो कोट घातलेला होता, तो ब्रिटनच्या माजी महाराणी व्हिक्टोरियांकडील पडद्यापासून शिवला होता. हा रेड वेलवेटचा पडदा त्यांनी एका लिलावात घेतला होता, नंतर त्याचा कोट बनवला होता.
उदयपूरला गेल्या होत्या एलिझाबेथ
आपल्या या भारत दौऱ्यादरम्यान महाराणी एलिझाबेथ जयपूरशिवाय उदयपूरला गेल्या होत्या. 30 जानेवारी 1961 रोजी त्या उदयपूरला गेल्या होत्या. तिथेही उदयपूरच्या राजघराण्याचे प्रमुख महाराणा भगवत सिंह यांनी त्यांचे पारंपरिक पेहरावात स्वागत केले होते. महाराणी एलिझाबेथ यांनी शिव निवास, पिछोला झील, जग मंदिरासह शहराच्या अनेक प्रमुख भागांचा दौरा केला होता. शहराचे सौंदर्य त्यांनी जवळून बघितले होते. महाराणी मोटरबोटने जग मंदिरात गेल्या होत्या. याशिवाय शहराच्या शिव निवासमध्ये स्थानिक मान्यवरांची त्यांनी भेट घेतली होती.
ज्या खोलीत वास्तव्य केले, तो आज लक्झरी सूट
जयपूरमधील राजमहाल पॅलेस हॉटेलनुसार, महाराणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलिप याच राजमहाल पॅलेसमध्ये थांबले होते. तेव्हा हा पॅलेस शाही कुटुंबाकडे होता. काही काळ येथे गायत्री देवींचेही वास्तव्य होते. आता हा पॅलेस लक्झरी हॉटेल आहे. या महालाच्या ज्या खोलीत एलिझाबेथ थांबल्या होत्या, तो आज महाराणी एलिझाबेथ सुट म्हणून ओळखला जातो.
पाहा त्या लक्झरी सूटची काही छायाचित्रे...

महाराणी एलिझाबेथ राजमहल पॅलेसमध्ये इथेच थांबल्या होत्या. आता हे लग्झरी हॉटेल बनले आहे.
महाराणी एलिझाबेथ राजमहल पॅलेसमध्ये इथेच थांबल्या होत्या. आता हे लग्झरी हॉटेल बनले आहे.
राजमहल पॅलेस हे आधी गायत्री देवींचे निवासस्थान होते.
राजमहल पॅलेस हे आधी गायत्री देवींचे निवासस्थान होते.
हे सूट खूप मोठे आहे. यात किडस रूमही वेगळ्या आहेत.
हे सूट खूप मोठे आहे. यात किडस रूमही वेगळ्या आहेत.
महाराणी एलिझाबेथ जयपूर दौऱ्यादरम्यान याच महालात थांबल्या होत्या.
महाराणी एलिझाबेथ जयपूर दौऱ्यादरम्यान याच महालात थांबल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...