आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Queen Elizabeth II Passes Away| Calling Herself 'Lilbet' And Reveling In Disguise After Her Victory In World War II.

श्रद्धांजली:सिंहासन डळमळले; तरी महाराणी एलिझाबेथ राहिल्या खंबीर, घरीच फ्रेंच आणि संविधानाचे शिक्षण

लंडन/नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लंडनमधील महाराणीचे जन्मस्थळ आता प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये बदलले आहे

राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ७० वर्षे ब्रिटनवर राज्य केले. २ जून १९५३ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ब्रिटिश राजवटीसह संपूर्ण जगात उलथापालथ होत होती. आर्थिक आणि सामरिक आव्हानांसोबतच राजकीय संकटाची छायाही होती. ब्रिटिश राजवट आणि जगभर पसरलेली स्थिती झपाट्याने कमी होत होती.

ब्रिटनमध्ये सामाजिक परिवर्तनाचा काळ सुरू होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक राजेशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. तथापि, एलिझाबेथ यांनी आव्हानांचा धैर्याने सामना केला. त्यांनी केवळ ब्रिटनची सत्ता काबीज केली नाही तर ब्रिटिश राजेशाहीवरील लोकांचा विश्वासही मजबूत केला. सात दशकांच्या कारकीर्दीत त्या जगातील सर्वात प्रसिद्ध चेहरा राहिल्या. दुसऱ्या महायुद्धातील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्या वेशांतर करून लंडनच्या रस्त्यावर उतरल्या. त्यांना कुणी ओळखूही शकले नाही.

कधी शाळेत गेल्या नाही, घरीच फ्रेंच आणि संविधानाचे शिक्षण
राणी एलिझाबेथ यांनी आपला बहुतेक वेळ लहान बहीण मार्गारेटसोबत लंडनच्या पॅलेसमध्ये घालवला. त्या कधीच शाळेत गेल्या नाही. इतिहास, फ्रेंच व संविधानाचे शिक्षण घरीच घेतले. वयाच्या सहाव्या वर्षी वेल्सच्या लोकांनी त्यांना घर भेट म्हणून दिले. राज्याच्या प्रमुख म्हणून, राणी एलिझाबेथ यांनी प्रथम ई-मेल वापरला. २६ मार्च १९७६ रोजी एलिझाबेथ यांनी पहिला ई-मेल पाठवला. मग ई-मेलचा ट्रेंड सुरू झाला. इंग्लंडच्या माल्व्हर्न रॉयल सेंटरमध्ये नेटवर्क टेक्नाॅलॉजी डेमोन्स्ट्रेशनदरम्यान त्यांनी हा ई-मेल पाठवला.

आधी डायना, मग प्रिन्स हॅरी प्रकरणांनी केले अस्वस्थ
९० च्या दशकात डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्यातील संबंध तुटले. त्यानंतर प्रिन्सचे कॅमिलासोबत प्रेमसंबंध होते. डायनाने ते सार्वजनिक केले. नात्यात कटुता येण्याचे प्रमुख कारण म्हणजे डायनाला बंधनात राहणे आवडत नव्हते. डायना राजेशाही परंपरांपासून दूर राहिल्याचं म्हटलं जातं. ही एकच गोष्ट राणीला आवडली नाही. डायनाच्या मृत्यूनंतर जनता राजघराण्याच्या विरोधात हाेती.

दुसऱ्या महायुद्धात एलिझाबेथ यांनी चालवला ट्रक
दुसऱ्या महायुद्धात वयाच्या १८ व्या वर्षी एलिझाबेथ महिला सहायक प्रादेशिक सेवेत सामील झाल्या. शाही कुटुंबातील त्या एकमेव महिला सदस्य होत्या. त्या सैन्य दलात सामील झाल्या आणि ट्रकही चालवला.

महाराणींकडे हाेती सुमारे २.२३ लाख कोटी रुपयांची संपत्ती
महाराणी एलिझाबेथ यांनी २० नोव्हेंबर १९४७ रोजी फिलिप माउंटबॅटनशी विवाह केला. ते ग्रीस आणि डेन्मार्कचे माजी राजकुमार होते. राणीला तिचा लग्नाचा पोशाख रेशन कुपनने विकत घ्यावा लागला. राणीकडे मौल्यवान हिरे व दागिन्यांसह सुमारे २८ अब्ज डॉलर (सुमारे २.२३ लाख कोटी रुपये) वैयक्तिक संपत्ती आहे. त्यांच्याशी संबंधित एक किस्सा असाही आहे की त्यांनी दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लग्न केले होते. त्यामुळे साेहळ्याचा खर्च मर्यादित ठेवावा लागला. यामुळे तिने लग्नात सॅटिनचा हस्तिदंती गाऊन परिधान केला होता.

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमवेत.
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमवेत.

गेल्या वर्षी पती फिलिपचा कोरोनामुळे झाला मृत्यू
एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलिप यांचा गतवर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसऱ्या महायुद्धात ते रॉयल नेव्हीत होते. त्यांच्या मृत्यूबद्दल एलिझाबेथ म्हणाल्या की, ७४ वर्षे वैवाहिक जीवनात ते माझी शक्ती होते आणि मी त्यांच्यासह राहिले.

महाराणी एलिझाबेथ तीनदा आल्या भारताच्या दौऱ्यावर

  • 21 जानेवारी १९६१ ला महाराणी द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचा पहिला भारत दौरा झाला. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या निमंत्रणानंतर त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांचा मान मिळाला.
  • 7 नोव्हेंबर १९८३ ला दुसऱ्यांदा भारतात आल्या. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झेलसिंह यांनी शाही जोडप्याचे स्वागत केले
  • 13 अॉक्टोबर १९९७ ला त्या तिसऱ्यांदा भारतात आल्या. राजघाटावर त्यांनी सँडल काढून फुले अर्पण केली होती.
बातम्या आणखी आहेत...