आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री कृष्ण जन्माष्ठमी:कृष्णभक्तीचे केंद्र आणि शक्ती आहे राधा तर बासरी ते मोरपंख... जाणुन घ्या 8 प्रमुख प्रतीकांचे अर्थ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीनिमित्त संपूर्ण देश कृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. कृष्णाचे गुण आठवून ते आत्मसात करण्याचा हा दिवस. राधा-कृष्ण आपल्याला भक्तीबद्दल काय शिकवण देतात. याबरोबरच श्रीकृष्णाची विशेष पूजा चार सोप्या टप्प्यांत कशी करावी आणि त्यांचा नैवेद्य कसा तयार करावा याविषयी...

बासरी ते मोरपंख... 8 प्रमुख प्रतीकांचे अर्थ

अजितंजय : सन्मान

गुरू सांदीपनींनी कृष्णाला हे धनुष्य दिले होते. कृष्णाने त्यांच्या मुलाला शंखासुराच्या तावडीतून सोडवले. हे गुरूच्या सन्मानाचे प्रतीक आहे.

विराट रूप : ऊर्जेचे सूचक

कृष्णाने कुरुक्षेत्रामध्ये आपले विराट रूप दाखविले. श्रीकृष्ण हे समस्त जगाचे पालनकर्ते आहेत. हे रूप उर्जेचे प्रतीक आहे.

रासलीला : आनंद
भगवंताचे हे स्वरूप मनाला आनंद देणारे आहे. या रूपाच्या दर्शनाने चिंता मिटून आनंद मिळतो.

गोवर्धन पर्वत : संरक्षण
श्रीकृष्णाने जो गोवर्धन पर्वत उचलला, त्या रूपाचीही पूजा होते. ईश्वराकडून् संरक्षण प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे.

चंदन : ताजेपणा
चंदन कृष्णाला प्रिय आहे. हरिचंदन, गोपीचंदन, पांढरे चंदन, यासह अनेक रूपांमध्ये दिसते. हे ताजेपणाचे प्रतीक आहे.

वैजयंती : प्रेमाची भेट
कृष्ण प्रथम रासलीला खेळले तेव्हा वैजयंती फुलांची माळ राधेने श्रीकृष्णाला घातली होती, म्हणून ती श्रीकृष्णाला फार प्रिय आहे.

मोरपंख : सौंदर्यबोध
मोरपंख भगवान कार्तिकेयाचे प्रतीक आहे. माता यशोदेने प्रथम श्रीकृष्णाच्या मुकुटावर ते लावले होते. हे सौंदर्याचे प्रतीक आहे.

बासरी : मन:शांती
नंदबाबांनी प्रथम श्रीकृष्णाला बासरी भेट दिली होती. ही भेट श्रीकृष्णाला फारच आवडली. हे मन:शांतीचे प्रतीक आहे.

कृष्णभक्तीत राधेचे विशेष स्थान आहे. तिला कृष्णाची शक्ती मानले गेले आहे. कृष्णभक्तीत राधा कशी जोडली गेली, हे सांगताहेत पौराणिक विषयांचे जाणकार देवदत्त पटनायक...

१४ वे शतक : कृष्णभक्तीची शक्ती बनली राधा
१४व्या आणि १५ व्या शतकात विद्यापती आणि चंडीदाससारख्या कवींनी राधेबद्दल आणखी लिहिले. हळूहळू राधेला कृष्णाच्या शक्तीच्या रूपात पाहिले जाऊ लागले. परंतु राधेला नेहमी कृष्णाची सखी मानले गेले, पत्नी नाही। रुक्मिणी आणि सत्यभामा यांचाच कृष्णाच्या पत्नी म्हणून उल्लेख येतो.

द्वारकेत रुक्मिणी व वृंदावनात राधेसोबत कृष्ण
द्वारकेच्या बहुतांश मंदिरांत कृष्ण एकटे आहेत. कुठे कुठे रुक्मिणी सोबत आहे. वृंदावनात कृष्ण राधेसोबत आहेत. ओडिशाच्या पुरीत बहीण सुभद्रा आणि भाऊ बलरामासोबत आहेत. कर्नाटकाच्या उडुपी, केरळच्या गुरुवायूर आणि राजस्थानच्या नाथद्वारामध्ये ते एकटे गुराखी रूपात आहेत.

इ.स.पूर्व 300 मध्ये कृष्णाचा महाभारतात प्रथम उल्लेख
कृष्ण व रुक्मिणीचा पहिला उल्लेख महाभारतात आहे. इ.स. पूर्व ३०० ते इ.स. ४०० पर्यंत संकलित या ग्रंथात कृष्णाचे गोपाळ रूप नाही. चौथ्या शतकात महाभारतात जोडल्या गेलेल्या ‘हरिवंश’ पर्वातही रासलीला आहे, पण राधा नाही. दक्षिणेत १० व्या शतकातील भागवत पुराणातही राधा नाही.

५व्या शतकात दक्षिणेत राधेचा पहिला उल्लेख
५व्या शतकात शिलापादिकरम या तामिळ महाकाव्यात नल-पिन्नई या मुलीचा उल्लेख आहे. ती मल (कृष्णाचे स्थानिक नाव) याला प्रिय आहे. हे राधेचे प्रारंभिक रूप मानले जाते. या ग्रंथानंतर दक्षिण भारतातीलच एका गवळण राधेचा उल्लेख उत्तर भारतातही पसरू लागतो.

१२वे शतक : राधेला दिली ‘गीतगाेविंदम्’ने प्रसिद्धी
१२व्या शतकात जयदेव लिखित ‘गीतगोविंदम्’ संस्कृत काव्याने राधेला घराघरात पोहोचवले. ओडिशाच्या जगन्नाथासहित अन्य मंदिरांत देवदासी राधा बनून ‘गीतगोविंदम्’वर नृत्य करू लागल्या होत्या. त्यानंतरच्या शतकात हा ग्रंथ आणि राधा संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली.

बातम्या आणखी आहेत...