आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rafale Fighter Jet Delivery India Latest News Today Update | First Batch Of Rafale Jets Arrived Today In Ambala From France

रफालची पहिली बॅच:फ्रान्स येथून 5 रफाल फायटर जेट भारताच्या दिशेने; केवळ यूएईत थांबून 7 हजार किमीचे अंतर गाठणार, हवेतच होणार रीफिलिंग

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय हवाई दलाची ताकद वाढण्यासाठी फ्रान्स येथून 5 रफाल विमानांची पहिली बॅच भारताच्या दिशेने निघाली आहे. फ्रान्सच्या हवाई तळावरून 7 हजार किमीचे अंतर पार करून हे विमान भारतात येणार आहेत. यात रीफिलिंगसाठी केवळ यूएईमध्ये विमान थांबतील. बहुप्रतीक्षित मल्टी-रोल फायटर जेट्सवर समस्त भारतीयांचे लक्ष लागले आहे. कोरोना महामारीमुळे या विमानांच्या डिलिव्हरीमध्ये विलंब झाला. या विमानांची शेवटची बॅच भारताला डिसेंबर 2021 पर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, चीनसोबत वाद सुरू असताना हे लढाऊ विमान लडाखमध्ये तैनात केले जाणार असल्याची शक्यता आहे.

आणखी पॉवरफुल बनवले जात आहेत विमान

भारतात येणारी रफाल लढाउ विमाने आणखी पॉवरफुल बनवले जात आहेत. भारतीय हवाई दल यात हॅमर मिसाइल लावत आहे. यासाठी अर्जंट ऑर्डर सुद्धा देण्यात आल्या आहेत. भारतीय हवाई दलाची गरज पाहता, फ्रान्सने ही क्षेपणास्त्रे इतरांसाठी राखीव असली तरीही ते आधी भारताला देणार असल्याचे म्हटले आहे. हायली एजाइल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज अर्थातच HAMMER मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. फ्रान्सने हे नौदल आणि हवाई दलासाठी तयार केले आहे. हे हवेतून जमीनीवर मारा करतात. हॅमर मिसाइलने लडाखसारख्या डोंगराळ भागात मजबूत शेल्टर आणि बंकर सहज उद्ध्वस्त केले जाऊ शकतात.

रफाल विमान मीटियर आणि स्काल्पसारख्या मिसाइलने सुसज्ज

रफाल फायटर जेट्स मीटियर आणि स्काल्प अशा मिसाइलने सुसज्ज आहे. मीटियर मिसाइल व्हिजुअल रेंज पार करून सुद्धा आपले लक्ष्य भेदू शकतात. याच वैशिष्ट्यामुळे हे मिसाइल जगभरात ओळखले जाते. हे मिसाइल 150 किमी पर्यंत मारा करू शकतात. स्काल्प डीप रेंजमध्ये टार्गेट हिट करू शकतात. स्काल्प मिसाइल 300 किमीपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करून ते नेस्तनाबूत करू शकतात. भारत आणि फ्रान्समध्ये 2016 मध्ये रफाल खरेदीचा करार झाला होता. यामध्ये 58 हजार कोटींत 36 रफाल विकत घेण्याची डील झाली होती. 36 पैकी 30 लढाउ विमाने तर 6 प्रशिक्षणार्थी विमाने असतील. प्रशिक्षणार्थी विमानांमध्ये सुद्धा फायटर जेट्सचे फीचर असतील.