आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Rafale Fighter Jet Delivery India Latest News Updates; Four Rafales To Arrive In India By July

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअरफोर्सची शक्ती वाढणार:भारताला जुलैमध्ये मिळतील पहिले 4 राफेल विमान, अंबाला एअरबेसवर होतील तैनात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
हा फोटो 8 ऑक्टोबर 2019 चा आहे. विजयदशमीच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रांसला जाऊन राफेल विमानाची पुजा केली होती - Divya Marathi
हा फोटो 8 ऑक्टोबर 2019 चा आहे. विजयदशमीच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रांसला जाऊन राफेल विमानाची पुजा केली होती
 • 2022 पर्यंत सर्व 36 राफेल विमान भारतात दाखल होतील
 • पहिले 18 राफेल जेट अंबाला एअरबेसमध्ये तैनात असतील

यावर्षी जुलैपर्यंत भारतातील एअरफोर्सच्या ताफ्यात चार राफेल फायटर प्लेन येणार आहेत. फ्रांसवरुन हे विमाने हरियाणातील अंबालाच्या एअरबेसमध्ये तैनात केले जातील. यात तीन विमान दोन सीट असलेले ट्रेनिंग विमान असतील, तर एक फायटर प्लेन असेल. सुरुवातीला हे विमान मे महिन्यातच येणार होते, पण कोरोना संकटामुळे यांच्या डिलिव्हरीला दोन महिन्यांचा उशीर लागत आहे. 

राफेल मिळाल्यानंतर वायुसेनेची ताकत वाढणार आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता पाकिस्तान आणि चीनपेक्षा भारताची वाढली आहे. म्हणजेच, हा जेट एकसाथ जमिनीपासून हवेतपर्यंत शत्रुचा खात्मा करू शकतो. एका राफेलला रोखण्यासाठी पाकिस्तानला दोन F-16 विमानांची गरज पडेल, यावरुनच राफेलच्या शक्तीचा अंदाजा लावला जाऊ शकतो. 

विमानात अधिनिक तंत्रज्ञान
भारतासाठी राफेल खुप महत्वाचे आहे. आतापर्यंत इजिप्त आणि फ्रांसमध्येर राफेलचा उपयोग होत आला आहे. परंतू, भारताला मिळणारे राफेल, जास्त अॅडव्हान्स असल्याचे सांगितले जात आहे. भारताच्या गरजेनुसार यात अतिरिक्त फीचर्स देण्यात आले आहेत. पहिले राफेल भारताकडून 17 गोल्डन एरोचे स्क्वॉड्रन कमांडिंग ऑफिसर उडवतील. त्यांच्यासोबत एक फ्रेंच पायलटदेखील असेल. 2022 पर्यंत सर्व 36 राफेल विमान भारताला मिळतील. पहिले 18 राफेल जेट अंबाला एअरबेसमध्ये तैनात असतील, तर इतर 18 विमान पूर्वोत्तरच्या हाशीमारामध्ये तैनात केले जातील.

सुखोई विमान विरुद्ध राफेल

 • सुखोई-30 एमकेआई फायटर जेटच्या तुलनेत राफेल ज्यास्त अॅडवांस.
 • सुखोईपेक्षा राफेल 1.5 पट जास्त कार्यक्षम.
 • राफेलची रेंज 780 ते 1055 किमी प्रती तास आहे, तर सुखोईची 400 ते 550 किमी प्रती तास.
 • राफेल प्रती तास 5 सोर्टीज लावू शकतो, तर सुखोई फक्त 3 .
बातम्या आणखी आहेत...