आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:अंबालात आज पहिले राफेल विमान लँड करणार ग्रुप कॅप्टन हरकिरत, १२ वर्षांपूर्वी बिघडलेले मिग सुरक्षित उतरवले होते...

अंबाला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवेतच भरले इंधन: फ्रान्सहून यूएईदरम्यान राफेलमध्ये हवेतच इंधन भरले गेले. यूएईहून भारतात येईपर्यंत दोन वेळा हवेत इंधन भरले जाईल.
  • राफेलचे स्वागत करणार हवाई दल प्रमुख भदौरिया, अंबाला तळाजवळ कडेकोट...

भारतीय हवाई दलातील सर्वात घातक ५ राफेल लढाऊ विमाने बुधवारी प्रथमच देशात उतरतील. यूएईच्या अल धफरा तळावरून उड्डाण घेतल्यानंतर ही विमाने थेट हरियाणातील अंबालास्थित हवाई तळावर उतरतील. दुपारपर्यंत ही विमाने पोहोचण्याची शक्यता आहे. ५ विमानांतील सर्वात पहिले विमान हवाई दलाच्या १७व्या गोल्डर एरो स्क्वाॅड्रनचे कमांडिंग ऑफिसर आणि शौर्यचक्र विजेते ग्रुप कॅप्टन हरकिरतिसंग लँड करतील. नंतर ४ राफेल उतरतील. स्वागतासाठी हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरियांसह वेस्टर्न एअर कमांडचे अधिकारी अंबाला उपस्थित असतील. सर्व पायलटस््चे कुटुंबीयही असतील. लँडिंगनंतर राफेलना वॉटर सॅल्यूट दिला जाईल. दरम्यान, हवाई तळाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त असून १४४ कलम लागू आहे. ३ किमी पर्यंत ड्रोन कॅमेऱ्यांनाही बंदी असेल.

हवेत स्फोट झाल्यानंतर बंद पडले होते मिगचे इंजिन, ते चालू करून रात्री उतरवले

ग्रुप कॅप्टन हरकिरतसिंग यांची वेगळी प्रतिष्ठा आहे. इंजिन बिघडलेले असतानाही जीव धोक्यात घालून मिग सुरक्षित उतरवल्याबद्दल त्यांना शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले होते. २३ डिसेंबर २००८ ची घटना. तेव्हा ते स्क्वॉड्रन लीडर होते. राजस्थानातून एका तळावरून मिग-२१ घेऊन ते सराव करत होते. ४ किमी उंचीवर इंजिनमध्ये अचानक स्फोट झाले. कॉकपिटमध्ये अंधार पसरला. हरकिरत यांनी वेळ न दवडता इंजिन चालू करण्याचा प्रयत्न केला. ते कसेबसे चालू करून रात्री लँडिंग केले. हरकिरत खरे तर उडी मारून बाहेर पडू शकले असते. परंतु, त्यांनी मिग सुरक्षित उतरवले. हरकिरत यांचे वडील निर्मलसिंग ले. कर्नल होते. पत्नी अंबालात विंग कमांडर आहे.