आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Rafale Induction Ceremony Today News Update Rajnath Singh, Bipin Rawat, Air Chief Marshal RKS Bhadauria

5 राफेल हवाई दलात सामिल:राजनाथ सिंह म्हणाले - राफेलचे सामिल होणे संपूर्ण जगाला कठोर संदेश, विशेषतः अशांना जे आपल्या हक्कांवर नजर टाकत आहेत

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • फ्रान्सकडून 36 राफेल डील अंतर्गत 5 जुलै रोजी 5 विमानांची पहिली तुकडी भारतात आली होती
 • राफेल हे चौथ्या जनरेशनचे सर्वात चपळ जेट आहे, यामधून अणू हल्लाही केला जाऊ शकतो

फ्रान्सकडून खरेदी केलेले 5 आधुनिक फायटर जेट राफेल भारत आल्याच्या 43 दिवसांनंतर आज अंबाला एअरफोर्स स्टेशनवर हवाई दलात सामिल झाले आहेत. या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "राफेल भारतीय वायुसेनेत असणे हे संपूर्ण जगाला एक कठोर संदेश आहे, विशेषतः त्यांच्यासाठी जे आपल्या हक्कांवर नजर टाकत आहेत. मी हवाईदलाच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. नुकतेच एलएसीवर झालेल्या दुर्देवी घटनेदरम्यान तुम्ही जी सतर्कता दाखवली यावरुन तुमच्या कमिटमेंटविषयी कळते"

तर हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया म्हणाले, "सध्याची सुरक्षेची स्थिती पाहता राफेलला सामिल करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ दुसरी कोणतीही नसू शकते." यापूर्वी फ्रान्सच्या डिफेंस मिनिस्टर फ्लोरेंस पार्ले यांच्या उपस्थिती सर्वधर्म म्हणजेच हिंदू, मुस्लिम, शिख आणि इसाई धर्मानुसार पूजा करण्यात आली. यानंतर एअर-शो झाले, यामध्ये फायटर प्लेनने आकाशात कसरती दाखवल्या. लँडिंगनंतर वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आले.

राफेलला एअरफोर्समध्ये सामिल करुन घेण्यासाठी सर्वधर्मियांकडून पूजा करुन घेतली
राफेलला एअरफोर्समध्ये सामिल करुन घेण्यासाठी सर्वधर्मियांकडून पूजा करुन घेतली

फायटर प्लेनच्या कसरतींचा व्हिडिओ

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फ्रान्सच्या डिफेंस मिनिस्टर फ्लोरेंस पार्ले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फ्रान्सच्या डिफेंस मिनिस्टर फ्लोरेंस पार्ले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
पूजेपूर्वी राफेल असे सजवण्यात आले
पूजेपूर्वी राफेल असे सजवण्यात आले

17 गोल्डन एरो स्क्वाड्रनमध्ये सामिल झाले राफेल
राफेल फायटर जेटची अंबाला येथील 17 गोल्डन एरो स्क्वाड्रनमध्ये औपचारिक एंट्रीची इतिहासात नोंद झाली आहे. 17 वर्षांनंतर देशाचे एखादे संरक्षण मंत्री अंबाला एअरफोर्स स्टेशनवर एखाद्या मोठ्या समारंभात सामिल झाले आहेत. यापूर्वी ऑगस्ट 2003 मध्ये एनडीए सरकारमध्ये संरक्षण मंत्री राहिलेले जॉर्ज फर्नांडिस यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अंबालामधून मिग-21 बाइसनमध्ये उड्डाण केले होते.

राफेलची वैशिष्ट्ये :-

 • 3 कोटी रुपयांपर्यंतचा लेजर बॉम्ब- मिका एअर-टू-एअर मिसाइल : 50 किमीच्या रेंजसह लक्ष्यानुसार आपला मार्ग निश्चित करू शकते.मीटियोर मिसाइलः जगातील अद्वितीय क्षेपणास्त्र. रेंज 100 किलोमीटर. ते अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते. क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याने राफेलला शत्रू देशाच्या सीमेत घुसून हल्ला करण्याची गरज भासणार नाही.
 • लेजर किंवा जीपीएस गायडेड बॉम्ब : एका बॉम्बची किंमत 50 हजार ते साडेतीन लाख युरो म्हणजे ४४ लाख ते ३ कोटी रुपयांपर्यंत असू शकते. आयएसआयएसवर हल्ल्यात बहुतांशी त्याचाच वापर झाला. राफेलमध्ये या प्रकारचे ६ बॉम्ब लागू शकतात. त्याचे बॉम्ब पॉड्स 10 किमीपर्यंत लक्ष्यावर निशाणा साधू शकते.
 • अंडर कॅरिजमध्ये एक रिव्हॉल्व्हर कॅनन : हे 30 मिमी गोळीचा 1055 मीटर प्रति सेकंदच्या वेगाने मारा करते. हे रिव्हॉल्व्हर कॅनन दर मिनिटाला 2500 गोळ्या मारू शकते.
 • फायर अँड फॉर्गेट क्रूझ मिसाइल : पायलटने बटण दाबल्यानंतर ते आपोआप लक्ष्याच्या दिशेने जाते.
 • शत्रूच्या क्षेपणास्त्राचा रस्ता चुकवतो : राफेलमधील स्पेक्ट्रा इंटिग्रेटेड डिफेन्स यंत्रणा शत्रूचे रडार जाम करू शकते आणि त्याच्याकडे येणाऱ्या क्षेपणास्त्राबाबत सावध करतो. तो विमानाच्या प्रोटेक्टिव्ह शील्डचे काम करतो. तो छद्म सिग्नल पाठवू शकतो आणि रडार सिग्नल जाम करू शकतो, शत्रूचे सिग्नल निष्क्रीय करू शकतो. तरीही शत्रूने क्षेपणास्त्राने हल्ला केला तर स्पेक्ट्रा डिकॉय सिग्नल सोडून त्या क्षेपणास्त्राचा मार्ग चुकवतो.
 • फ्लाइट रेंज आणि इंधन क्षमता : फ्लाइंट रेंज साडेदहा तासांपेक्षा जास्त आहे. म्हणजे सतत 10 तासांपेक्षा जास्त उडू शकते. या दरम्यान 6 वेळा त्यात इंधन भरण्याची गरज भासते. जे हवेतच भरता येते. यात साडेपाच टन इंधन साठा होऊ शकतो. पूर्ण वेगात ते 10 मिनिटात 5 टन इंधन खर्च करते.
 • राफेलचे 3 प्रकार छट्रेनर- दोन आसनी, राफेल सी- सिंगल सीटर, राफेल एम- नेव्हीच्या विमानवाहू जहाजासाठी. ते अण्वस्त्र हल्लाही करता येऊ शकतो. एक राफेल तयार करण्यात सुमारे 2 वर्षांचा कालावधी लागतो. यासाठी 7000 कर्मचारी सतत काम करतात.
बातम्या आणखी आहेत...