आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचल प्रदेशातील तवांग क्षेत्रात चीनच्या घुसखोरीनंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या गर्जनांमुळे गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) थरथरली. हवाई दलाच्या दोनदिवसीय लष्करी कवायतींच्या प्रारंभीच राफेल आणि सुखोई या लढाऊ विमानांसह अत्याधुनिक हेलिकॉप्टर शिनूक आणि अपाचे यांची ताकद व तयारी जोखण्यात आली. हवाई दलाने पश्चिम बंगालपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या संपूर्ण परिसरात युद्धाभ्यास करण्यात येत आहे. लढाऊ िवमानांच्या या कवायती तवांग क्षेत्रात सुमारे ३०० चीनी सैनिकांच्या घुसखोरीनंतर सुरु झाल्या. हाशिमारा तळावरून लढाऊ जेट विमानांनी उड्डाण केले. तेजपूर, जोरहाट, पानागढ आणि छाबुआ तळांवरही या कवायती करण्यात आल्या. शुक्रवारीही या कवायती सुरु राहतील.
हेरोन ड्रोन गस्तीमुळे घुसखोरीचा डाव उघड
दोन महिन्यांपूर्वी चीनच्या २०० सैनिकांनी अरुणाचलच्या यांगत्सेमध्ये भारतीय यांकी चौकीवर कब्जा आणि घुसखोरीचा प्रयत्न केला होता. इथे लष्कराचे हेरोन ड्रोन निगराणी करते. ड्रोनने दिलेल्या माहितीमुळेच घुसखोरीचा डाव उघड झाला,असे सूत्रांनी सांगितले
फ्रान्सतर्फे ३६ वे राफेल लढाऊ विमान भारतीय ताफ्यात
गुरुवारी ३६ वे राफेल लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले. याचबरोबर भारत आणि फ्रान्सच्या डेसो कंपनीसोबतचा ५८ हजार कोटी रुपयांचा राफेल करार संपुष्टात आला.
ओडिशाच्या अब्दुल कलाम तळावरून प्रथमच पूर्ण अंतरावर अग्नी-5 क्षेपणास्त्र डागले,चाचणी यशस्वी
देशाचे सर्वात शक्तिशाली जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्नी-५ क्षेपणास्त्राची रात्रीची चाचणी यशस्वी ठरली. ओडिशाच्या अब्दुल कलाम तळावरून प्रथमच पूर्ण म्हणजे ५५०० कि.मी. अंतरावर ते डागण्यात आले. क्षेपणास्त्राने अचूक वेध घेत टार्गेट उद्ध्वस्त केले. यामुळे संपूर्ण चीन क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला आहे.
अग्नी-5 क्षेपणास्त्र
50 हजार किलोग्रॅम वजन
17.5 मीटर लांबी
1500 किलोग्रॅम वजनी अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता
3 स्टेजचे रॉकेट बूस्टर घन इंधनावर उड्डाण करू शकते.
8.16 किमी अंतर अवघ्या एका सेकंदात कापते
29,401 किमी ताशी वेगाने हल्ला करण्याची क्षमता.
{मॅक 24 स्पीड (ध्वनीपेक्षा २४ पट जास्त गती )
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.