आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rafel Deal: Frech Media Allegates To Intermediaries In Rafel Deal; News And Live Updates

फ्रेंच माध्यमांचा दावा:राफेल सौद्यामध्ये भारतीय मध्यस्थांना 8.65 कोटींचे ‘गिफ्ट’; केंद्रीय मंत्री रविशंकर म्हणाले, फ्रान्समध्ये कॉर्पोरेट शत्रुत्वामुळे आरोप शक्य

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या रकमेतून राफेलची 50 मॉडेल बनवली : दसॉल्ट

भारत-फ्रान्स यांच्यातील राफेल लढाऊ विमान सौद्यात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे अाराेप लागले आहेत. फ्रान्सधील एका वृत्तात सनसनीखेज दावा करण्यात आला आहे. त्यानुसार राफेल तयार करणारी फ्रेंच कंपनी दसाॅल्टने भारतात एका मध्यस्थाला १० लाख युरो (सुमारे ८.६५ कोटी रुपये) ‘भेट म्हणून’ दिले होते. फ्रेंच माध्यम समूह ‘मीडियापार्ट’ने आपल्या वृत्तात हे दावे केले आहेत. त्यानुसार, २०१६ मध्ये राफेल विमानांबाबत झालेल्या करारानंतर दसॉल्टने भारतात एका मध्यस्थाला ही रक्कम दिली होती. दसॉल्ट ग्रुपच्या खात्यातून २०१७ मध्ये ‘गिफ्ट टू क्लायंट्स’ म्हणून रक्कम हस्तांतरित झाली होती. फ्रान्सच्या भ्रष्टाचारविरोधी ‘एएफए’ संस्थेने दसॉल्टच्या खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली.

या गौप्यस्फोटानंतर दोन्ही देशांत राफेल सौद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने चौकशीची मागणी करत पंतप्रधानांकडे उत्तर मागितले. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘सुप्रीम काेर्टाने साैद्यात चौकशीची मागणी फेटाळली आहे. कॅगलाही यात गैरव्यवहार आढळला नाही. ताजे अाराेप फ्रान्समधील काॅर्पाेरेट शत्रुत्वामुळे झालेले असू शकतात.’ राफेलच्या प्रतिकृती वायुदल प्रमुखांच्या बंगल्यासमोर, पश्चिमी वायू कमांड, ग्वाल्हेरमध्ये वायुदल तळांवर लावलेल्या आहेत. हासीमारात राफेल स्क्वाॅड्रनसाठी काही मॉडेल रवाना झाली आहेत. काही वेअरहाऊसमध्ये आहेत. दसॉल्टनुसार हीच मॉडेल तयार करण्यासाठी पैसे देण्यात आले होते.

या रकमेतून राफेलची ५० मॉडेल बनवली : दसॉल्ट
दसॉल्टने म्हटले की, ही रक्कम राफेलची ५० मॉडेल तयार करण्यात खर्च झाली. कंपनीने भारतीय सब-काँट्रॅक्टर डेफसिस सोल्युशन्सच्या इनव्हाइसमधून दाखवले होते की जी ५० मॉडेल्स तयारी झाली होती त्याची निम्मी रक्कम त्यांनी दिली. प्रत्येक मॉडेलची किंमत २० हजार युरोपेक्षा जास्त हाेती. एकूण रक्कम १० लाख युरोंवर जाते. तथापि, वृत्तानुसार, हे माॅडेल तयार केल्याचे पुरावे नाहीत.

भारतीय कंपनी वादात
ज्या भारतीय कंपनीचे नाव या वृत्तात आले आहे, ती आधीपासून वादात सापडलेली आहे. वृत्तानुसार, कंपनीचा मालक (सुशेन गुप्ता) आधीही ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात तुरुंगात गेलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...