आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम आदमी पक्षाने (आप) पंजाबमधील राज्यसभेच्या जागांसाठी ५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात माजी क्रिकेटपटू हरभजनसिंगसह (४१) दिल्लीचे आमदार व पंजाबमधील विजयाचे रणनीतीकार राघव चड्ढा (३३) आहेत. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल, आयआयटी दिल्लीचे प्रा. संदीप पाठक व उद्योगपती संजीव अरोरा यांची नावेही यादीत आहेत. या जागांवर ३१ मार्चला मतदान होईल.
पंजाब विधानसभेत ११७ पैकी ९२ आमदार आपचे आहेत. त्यामुळे या सर्वांची निवड निश्चित आहे. आता राज्यसभेत आपच्या खासदारांची संख्या आठ होईल. राघव चड्ढांची निवड झाल्यास ते राज्यसभेत आतापर्यंतचे सर्वात कमी वयाचे सदस्य असतील. यापूर्वी बॉक्सर मेरी कोम ३५ व्या वर्षी, तर रिताव्रत बॅनर्जी ३४ व्या वर्षी खासदार झाल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.