आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चढ्ढा यांची 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट झाली. समारंभात, परिणीतीने तिच्या केसरी चित्रपटातील माही वे गाणे लिप-सिंक केले आणि हे गाणे राघव यांना डेडिकेट केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.
परिणीतीने चित्रपटातील गाणे राघव यांना डेडिकेट केले
व्हिडिओमध्ये परिणीती गाण्याच्या ट्यूनवर एक्सप्रेशन देत राघव यांना मिठी मारताना दिसत आहे. दरम्यान राघव यांनी परिणीतीच्या गालावर चुंबन घेत तिला मिठी मारली. व्हिडिओमध्ये परिणीतीचे वडील पवन चोप्राही तिच्या मागे उभे राहून हसताना दिसत आहेत.
या सोहळ्यात मिका सिंगनेही परफॉर्म केले
या कार्यक्रमात गायक मिका सिंगनेही राघव-परिणितीसाठी गाणे गायले. मिकाच्या परफॉर्मन्सवर परिणीती-राघवने स्टेजवर डान्स स्टेप्सही केल्या.
राघव-परिणितीच्या जोडीचे चाहत्यांकडून कौतुक
सोशल मीडियावर यूझर्स या व्हिडिओवर सातत्याने कमेंट करत आहेत. एका यूझरने लिहिले - हे दोघे त्यांच्या नात्याबद्दल किती शांत होते. आज खरे प्रेम पहा! त्याचवेळी एका यूझरने लिहिले - त्यांना आनंदी पाहून खूप आनंद झाला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल हेही राघव-परिणितीच्या एंगेजमेंट सोहळ्याला आले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.