आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीच्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांचेही नाव समोर आले आहे. तथापि त्यांना आरोपी बनवण्यात आलेले नाही. याआधी मंगळवारी सकाळीही आप खासदार संजय सिंह यांचे नाव समोर आले होते. आरोपपत्रात त्यांच्यावर 82 लाख रुपयांची देणगी स्वीकारल्याचा उल्लेख होता.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सिसोदियांचे तत्कालीन सचिव सी अरविंद यांनी राघव चड्ढा यांचे नाव घेतले आहे. सिसोदियांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत राघव चड्ढा, अबकारी आयुक्त वरुण रुजम आणि मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य आरोपी विजय नायर उपस्थित होते असे त्यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे.
चड्ढा म्हणाले - मी अशा कोणत्याही बैठकीत उपस्थित नव्हतो
राघव चड्ढांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, ईडीच्या आरोपपत्रात माझे नाव आल्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. माझी प्रतिष्ठा आणि विश्वसनीयतेला धक्का पोहोचवण्यासाठी हे केले जात आहे. ईडीने कोणत्याही तक्रारीत मला आरोपी केलेले नाही. माझे नाव एखाद्या बैठकीत उपस्थित असल्याबद्दल घेतले जात आहे. मी अशा कोणत्याही बैठकीत उपस्थित नव्हतो.
16 एप्रिलला सीबीआयने केजरीवालांची चौकशी केली होती
मद्य धोरण घोटाळ्यात सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची 16 एप्रिल रोजी सुमारे 9 तास चौकशी केली होती. केजरीवाल सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी सीबीआयच्या कार्यायलात पोहोचले होते आणि रात्री 8.30 वाजता बाहेर आले होते.
बाहेर येऊन केजरीवालांनी म्हटले होते की, सीबीआयने जितके प्रश्न विचारले, त्या सर्वांची उत्तरे मी दिली. आमच्याकडे लपवण्यासाठी काहीही नाही. संपूर्ण मद्य धोरण घोटाळा खोटा आणि राजकारणाने प्रेरित आहे. आम आदमी पक्ष प्रामाणिक पक्ष आहे. आम्ही प्रामाणिकतेशी कधीही तडजोड करणार नाही. ते आपला संपवू पाहत आहेत. मात्र देशातील जनता आमच्यासोबत आहे. त्यांनी सुमारे 56 प्रश्न विचारले.
ही बातमीही वाचा...
घोटाळ्याची धग मुख्यमंत्र्यांपर्यंत:दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स, 16 एप्रिलला CBI करणार चौकशी
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याचा तपास आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. कारण याप्रकरणी CBI आता आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. त्यांना 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह आज संध्याकाळी 6 वाजता यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. (वाचा पूर्ण बातमी)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.