आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजद नेता रघुवंश काळाच्या पडद्याआड:रघुवंश प्रसाद सिंह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी झाले निधन, 3 दिवसांपूर्वीच दिला होता पक्षाचा राजीनामा, पण लालूंनी केला नव्हता स्वीकार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रघुवंश यांनी 23 जूनला पार्टीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

राजद नेता आणि लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय रघुवंश प्रसाद सिंह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी दिल्लीच्या एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रघुवंश जेव्हा पटना एम्समध्ये दाखल होते. तेव्हा त्यांनी 23 जूनला पार्टीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते रामा सिंहच्या राजदमध्ये गेल्याच्या वृत्तामुळे नाराज होते. रघुवंश यांना 18 जूनला कोरोनाची लागण झाली होती. तर एक जुलैला त्यांना पटना एम्समधून सुट्टी मिळाली होती.

आता तुमच्या मागे उभा राहणार नाही - रघुवंश
10 सप्टेंबरला त्यांनी रुग्णालयाच्या बेडवरुनच राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना राजीनामा पाठवला होता. आपल्या राजीनाम्यात त्यांनी लिहिले होते की, 'जन नायक कर्पूरी ठाकूरच्या निधानंतर 32 वर्षे तुमच्या पाठीमागे उभा राहिलो, पण आता नाही. पार्टी, नेता, कार्यकर्ता आणि आम जनतेचे खूप प्रेम मिळाले, मला माफ करा.'

तुम्ही कुठेही जाणार नाही - लालू
लालू प्रसाद यादव रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. आपल्या निकवर्तीयाच्या नाराजीनंतर त्यांनी स्वतः मोर्चा सांभाळला. रघुवंश यांना पत्र पाठवले, 'राजद कुटुंब तुम्हाला लवकर बरे होऊन सर्वांमध्ये पाहू इच्छिते. चार दशकांमध्ये आपण प्रत्येक राजकीय, सामाजिक आणि कौटुंबीक प्रकणांमध्ये बसून विचार केला आहे. तुम्ही अवश्य बरे व्हा यानंतर बसून बोलूया. तुम्ही कुठेही जाणार नाही हे समजून घ्या.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser