आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahat Indori Death News Update | Bollywood Lyricist And Urdu Language Poet Rahat Indori Passes Away In Madhya Pradesh Indore

दुःखद बातमी:प्रसिद्ध शायर राहत इंदौरींनी घेतला जगाचा निरोप, निमोनिया आणि कोरोनामुळे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध शायर राहत इंदौरींनी जगाचा निरोप घेतला आहे. कोरोना आणि निमोनियामुळे वयाच्या 70 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहत इंदौरी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळले त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहत इंदौरी यांचे सुपुत्र सतलज यांनी याविषयी माहिती दिली. नंतर स्वतः राहत इंदौरी यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली होती. यानंतर त्यांना लागोपाठ तीन हार्टअटॅक आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

निमोनियामुळे आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते

राहत इंदौरी यांचा मुलगा आणि युवा शायर सतलज यांनी सांगितले होते की, वडील चार महिन्यांपासून केवळ रुटीन चेकअपसाठी बाहेर पडत होते. त्यांना चार-पाच दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यावर एक्सरे करण्यात आला होता. निमोनियाचे निदान झाले. यानंतर सँपल तपासण्यासाठी पाठवण्यात आले. यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले. राहत यांना हृदयरोग आणि डायबिटीज होता. त्यांचे डॉक्टर रवी डोसी यांनी सांगितले होते की, त्यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये निमोनिया होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

मुन्नाभाई एमबीबीएस आणि मर्डरसारख्या चित्रपटांमध्ये लिहिले होते गाणे
राहत इंदौरी यांचा जन्म 1 जानेवारी 1950 मध्ये मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये झाला होता. त्यांनी बरकतुल्लाह यूनिव्हर्सिटीमधून उर्दूमध्ये एमए केले होते. भोज यूनिवर्सिटीने त्यांना उर्दू साहित्यात पीएचडी प्रदान केली होती. राहत यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, मीनाक्षी, खुद्दार, नाराज, मर्डर, मिशन कश्मीर, करीब, बेगम जान, घातक, इश्क, जानम, सर, आशियां आणि मै तेरा आशिक सारख्या चित्रपटांमध्ये गीत लिहिले.

बातम्या आणखी आहेत...