आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी घेतला भाकरी-चटणीचा आस्वाद:गव्हाची खीर, मिरची भजे व शेंगदाण्याची चटणी खाल्ली; भजे तळण्याचाही केला प्रयत्न

बुलढाणा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भारत जोडो यात्रेत बाजरीची भाकरी व शेंगदाण्याच्या चटणीचा आस्वाद घेतला. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय होता मेनू?

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. त्यात राहुल गांधी मराठमोठ्या जेवणाचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व इतर नेतेही जेवताना दिसून येत आहेत. जेवणात राहुल यांना दही-धपाटे, बाजरीची भाकरी, शेंगदाण्याची चटणी, मिरची भजे व गुळ-गव्हाची खिर वाढण्यात आली. ती त्यांनी आनंदाने स्वीकारली.

भजे तळण्याचाही केला प्रयत्न

जेवताना राहुल यांनी बाळासाहेब थोरात यांना हे काय आहे अशी विचारणा केली. त्यावर थोरातांनी या खास मेन्युची त्यांना हिंदीत ओळख करून दिली. जेवणानंतर राहुल यांनी जेवण तयार करणाऱ्या महिलांचेही कौतुक केले. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांच्याजवळ बसून भजे तळण्याचाही प्रयत्न केला. हे पाहून महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

राहुल गांधी मिरची भजे तळताना.
राहुल गांधी मिरची भजे तळताना.

सावरकरांवर विधान अन् तीव्र पडसाद

राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून अवघा भारत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची ही यात्रा तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली. ती गत आठवड्यात महाराष्ट्रात दाखल झाली. तेव्हापासून शेकडो लोकांनी त्यांच्या यात्रेत सहभाग घेतला आहे. या यात्रेत राहुल यांनी नुकतेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.

रविवारी मध्य प्रदेशाकडे प्रयाण

राहुल यांनी शुक्रवारी आपल्या शेगाव येथील मुक्कामात संत गजानन यांचे दर्शन घेतले. तसेच एका सभेलाही संबोधित केले. राहुल यांची यात्रा रविवारी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडे रवाना होईल.

बातम्या आणखी आहेत...