आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi And J P Nadda : COVID 19, GST Will Be Future Harvard Case Studies On Failure, Rahul Gandhi Dig At Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारच्या धोरणांवर टीका:राहुल गांधी म्हणतात - कोरोना, नोटबंदी, जीएसटीचे अपयश हार्वर्डसाठी केस स्टडी, तर राहुल हे कमिटींवर नव्हे तर कमिशनवर वर्चस्व असलेल्या राजघराण्यातील, भाजपचा टोला 

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप अध्यक्ष जेपी नड्डा चीनच्या मुद्द्यावर म्हणाले - राहुल गांधी सैनिकांच्या शौर्यावर सवाल करत आहे
  • 'कॉंग्रेसमध्ये अनेक सक्षम नेते आहेत, पण राजवंश त्यांना पुढे जाऊ देणार नाही'

सोमवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेव्हा भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कॉंग्रेसच्या या वृत्तीला देशाचे मनोबल तोडणारे म्हटले आहे. राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले की, कोविड-19, नोटबंदी आणि जीएसटी प्रकरणात सरकारचे अपयश हे भविष्यात हार्वर्ड बिझिनेस स्कूलसाठी केस स्टडी असेल. यापूर्वी, त्यांनी लॉकडाउनची स्ट्रॅटजी अपयशी ठरल्याचे वारंवार सांगितले आहे.

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मोदी म्हणाले होते की महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. परंतु कोरोनाविरूद्धचा लढा 21 दिवस चालेल. राहुल गांधी यांनी यावर लक्ष वेधले. ते म्हणाले की, दररोज कोरोनाचे केस वाढत आहे. जगभरातील कोरोना संक्रमितांच्या देशांमध्ये भारतही पुढे आहे. 

भाजपा म्हणाले - राहुल यांची मनोवृत्ती बेजबाबदार आहे

दुसरीकडे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चीनच्या मुद्यावर राहुल यांच्यावर टीका केली आहे. नड्डा म्हणाले की संरक्षणविषयक स्थायी समितीच्या कोणत्याही बैठकीत राहुल गांधी उपस्थित नव्हते. ते आमच्या सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सतत देशाचे मनोबल तोडत आहेत. तसेच जबाबदार विरोधकांनी करू नये असे काम ते करीत आहे. असे जेपी नड्डा म्हणाले. 

नड्डा म्हणाले की, राहुल महान घराणेशाही परंपरांशी संबंधित आहेत, जिथे संरक्षण प्रकरणातील समितींपेक्षा कमिशन महत्त्वाचे असते. कॉंग्रेसमध्ये बरीच सक्षम माणसे आहेत ज्यांना संसदीय बाबी समजतात, पण राजवंश त्यांना कधीही पुढे जाऊ देणार नाही. ही खेदाची बाब आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser