- Marathi News
- National
- Rahul Gandhi Appear In Surat Court; Defamation Case | Modi Surname Controversy | Rahul Gandhi
राजकारण:राहुल गांधी देणार शिक्षेला आव्हान, अपात्रतेनंतर 11 दिवसांनी जाणार कोर्टात; कोर्टाने दिली होती 30 दिवसांची मुदत
लोकसभा सदस्यत्व गेल्यानंतर राहुल गांधी यांनी 25 मार्च रोजी पत्रकार परिषद घेतली होती.
'सर्वच चोरांचे आडनाव मोदी का असते...' या विधानाशी संबंधित मानहाणीच्या एका प्रकरणात सुरत कोर्टाने 23 मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 मार्च रोजी राहुल याचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर 11 दिवसांनंतर राहुल या निर्णयाविरोधात सुरतच्या सेशन कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने काँग्रेस सूत्रांचा दाखला देत राहुल यांची लीगल टीम 3 मार्च (सोम) रोजी कोर्टात जाणार असल्याचा दावा केला आहे.
23 एप्रिल रोजी राहुल यांच्या हजेरीत न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा व 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर काही वेळातच कोर्टाने त्यांना जामीनही मंजूर केला होता. तसेच शिक्षेलाही 30 दिवसांची स्थगिती दिली होती. म्हणजे या काळात राहुल यांना अटक होणार नाही. त्यांना याविरोधात उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल.
राहुल यांच्या शिक्षेवर काँग्रेसने कोणती कारवाई केली, 3 महत्त्वाचे मुद्दे
1. जेल की अपील, पक्षश्रेष्ठींमध्ये दुमत
राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात पक्षही 2 गटांत विभागला गेल्याचे सूत्रांनी दिव्य मराठीला सांगितले. या निर्णयाविरोधात राहुल यांनी उच्च न्यायालयात जावे, अशी एका गटाची इच्छा होती. दुसरीकडे, राहुल तुरुंगात गेल्यास पक्षाला सहानुभूती मिळेल व आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल, अशी दुसऱ्या गटाची इच्छा आहे.
2. पक्षाचे मतैक्य, राजकीय व कायदेशीर लढा लढणार
सूत्रांच्या माहितीनुसार, अखेरीस ही लढाई राजकीय व कायदेशीर अशा दोन्ही आघाड्यांवर लढण्याचा निर्णय झाला. पण निकालाचे गुजरातीतून इंग्रजीत भाषांतर करण्यास विलंब झाल्यामुळे शिक्षेविरुद्ध न्यायालयात जाण्यास उशीर झाल्याचा दावा काँग्रेसने केला.
3. राहुल लीगल टीमवर नाराज
या निर्णयाला आव्हान द्यायचे की तुरुंगात जायचे यावर पक्षनेतृत्वात एकमत नव्हते. तुरुंगात गेल्याने सहानुभूतीची लाट निर्माण होईल, असे एक मत होते. दुसरे हे की आव्हान न देणे म्हणजे चूक मान्य केल्यासारखे ठरेल. त्यामुळे यासंबंधीचा अंतिम निर्णय सोनिया गांधींवर सोपवण्यात आला. 4 वर्षांपासून सुरू असलेला हा खटला गांभीर्याने न लढवणाऱ्या आपल्या कायदेशीर टीमवर राहुल गांधी चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे.
12 एप्रिल रोजी पाटणा कोर्टात होणार हजर
मानहाणीच्या अन्य एका प्रकरणात राहुल गांधी 12 एप्रिल रोजी पाटणा न्यायालयात हजर होणार आहेत. राहुल यांनी मोदी आडनाव असलेल्यांचा चोर म्हणून अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये मानहानीचे 5 गुन्हे दाखल आहेत. यापैकी एका प्रकरणात सुरत न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
राहुल गांधींवर दाखल या मानहाणीच्या खटल्यांची माहिती घ्या...
- 2014 मध्ये राहुल गांधींनी आरएसएसवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप केला. या प्रकरणी संघाच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्याविरोधात भादंवि कलम 499 व 500 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्रातील भिवंडी न्यायालयात हा खटला सुरू आहे.
- 2016 मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात आसामच्या गुवाहाटीत कलम 499 व 500 अंतर्गत मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, राहुल गांधींनी आरएसएसवर आसामच्या 16 व्या शतकातील वैष्णव मठ बारपेटा सत्रात आपल्याला प्रवेश दिला नसल्याचा आरोप केला होता. यामुळे संघाची प्रतिमा मलिन झाली. हे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे.
- 2018 मध्ये झारखंडची राजधानी रांचीमध्ये राहुल गांधींविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. रांचीच्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. भादंवि कलम 499 व 500 अंतर्गत राहुल यांच्यावर 20 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल यांच्या मोदी चोर आहेत या विधानावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
- 2018 मध्येच राहुल गांधींवर महाराष्ट्रात आणखी एक मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. माझगाव येथील शिवडी न्यायालयात हा खटला सुरू आहे. या प्रकरणी भादंवि कलम 499 व 500 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरएसएस कार्यकर्त्याने हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी राहुल यांच्यावर गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध भाजप व संघाच्या विचारसरणीशी जोडल्याचा आरोप आहे.
- 2018 मध्ये एडीसी बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीनंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत 5 दिवसांत 745.58 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. या बँकेच्या संचालकांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही समावेश आहे.
- 2017 मध्ये बंगळुरू येथे पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. राहुल यांनी या हत्येचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडल्याप्रकरणी मुंबईत एक मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीचे विधान बदनामीकारक व लोकांच्या नजरेत संघाची प्रतिमा मलिन करणारे आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
- 2018 मध्ये, राहुल यांनी राफेल फायटर जेट डीलवरून भाजपची खिल्ली उडवली. त्यांनी एका ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते - The Sad Truth About India Commander in Thief. या प्रकरणी गुरगाव कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
- 2019 मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जबलपूरमध्ये हत्येचा आरोप केला होता. या संदर्भात अहमदाबाद कोर्टात राहुलच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
- झारखंडमध्ये 2019 मध्ये राहुल म्हणाले - काँग्रेस भाजप सारखा एका खुनी व्यक्तीला केव्हाच अध्यक्ष म्हणून स्वीकार करणार नाही. त्यांच्या या विधानाप्रकरणी चाईबासा व रांचीमध्ये मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
- 2022 मध्ये राहुल म्हणाले की, सावरकरांनी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्या माफीनाम्यावर सही केली होती. या प्रकरणी सावरकर यांचे नातू विनायक सावरकर यांनी मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.