आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणाबाबत सरकारला सवाल:जगभरात 23 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली; भारताचा नंबर कधी येणार? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना लस काही आठवड्यात तयार होईल असे मोदींनी 4 नोव्हेंबर रोजी सांगितले होते

चीन, अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या देशांनी कोरोना लसीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लस निर्मिती केंद्रांना भेट दिल्यानंतर भारतातही लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र अद्याप लसीकरणाला सुरुवात झाली नाही. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीकरणावरून प्रश्न विचारला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केली यात ते म्हणाले की, “जगभरात 23 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. चीन, अमेरिका, ब्रिटन आणि रशियातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार?”

मोदी म्हणाले होते - काही आठवड्यात ही लस तयार होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर 4 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीनंतर ते म्हणाले की कोरोना लस काही आठवड्यांत तयार होईल, पहिला डोस आजारी वृद्ध आणि आरोग्य कामगारांना दिली जाईल. यापूर्वी 2 नोव्हेंबरला मोदींनी व्हॅक्सीन बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटसह इतर तीन कंपन्यांना भेट देऊन आढावा घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...